तळेगावात सामुदायिक विवाह
By Admin | Updated: April 21, 2017 05:53 IST2017-04-21T05:53:33+5:302017-04-21T05:53:33+5:30
रोटरी क्लब आॅफ तळेगाव सिटी व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी आयोजित राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ४४ जोडपी विवाहबद्ध झाली.

तळेगावात सामुदायिक विवाह
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब आॅफ तळेगाव सिटी व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसी आयोजित राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ४४ जोडपी विवाहबद्ध झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजित मुहूर्तावर मंगलाष्टकांच्या घोषात शिस्तबद्ध विवाह सोहळा झाला.
अॅड. पु. वा. परांजपे विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या विवाह सोहळ्यात आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पुणे पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, प्रांतपाल प्रशांत देशमुख, अभय गाडगीळ, रवी धोत्रे उपस्थित होते. रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, रोटरी एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी स्वागत केले. माजी आमदार दिगंबर भेगडे व प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी आशीर्वाद दिले. कार्यक्रमासाठी सुनील भोंगाडे, मिलिंद शेलार, हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश धोत्रे, दिलीप पारेख यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)