शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 20:47 IST

जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी..

ठळक मुद्देशहरातील हातगाडी, पथारी व्यावसायिक तसेच पोळीभाजी सेंटर इत्यादी व्यवसायांवरील निर्बंध हटवा

पिंपरी : कोरोना महामारीमुळे शहरातील सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली महापालिका व शासनाच्या तिजोरीची लुटमार होत आहे. आरोग्य विभागाचा भ्रष्ट कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप करून अशा कारभाराच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर समितीतर्फे गुरुवारी आकुर्डी येथे निदर्शने करण्यात आली. रुग्ण सेवेचा दर्जा सुधारून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करून आंदोलकांनी भर पावसात घोषणाबाजी केली. पक्षाच्या शहर समितीचे क्रांतीकुमार कडुलकर, गणेश दराडे, अपर्णा दराडे, स्वप्निल जेवळे, सचिन देसाई, कुणाल म्हेत्रे, संजय म्हेत्रे, सुरेश बाबू, रंजीता लाटकर, अविनाश लाटकर, किसान शेवते, संजय ओहोळ, एकनाथ साळवी,संतोष गायकवाड,विनोद चव्हाण,सुषमा इंगोले आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तात्पुरत्या जम्बो रुग्णालयाऐवजी कायम स्वरूपी संसंर्गजन्य रुग्णालय उभारण्यात यावे. जिजामाता रुग्णालय किंवा नवीन भोसरी रुग्णालय कायमस्वरूपी संसंर्गजन्य रुग्णालय म्हणून जाहीर करावे. वायसीएम रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील महापालिकेच्या डॅशबोर्डवर भागिदारीतील खासगी रुग्णालयातील रुग्णांची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट दररोज उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक वार्डात अँटिजेंन आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वतंत्र सेंटर स्थापित करावे. रुग्ण सेवेसाठी कायमस्वरूपी डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय यांची नेमणूक करून कंत्राटी पद्धत बंद  करावी, जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी. सरासरी २५० रुपये प्रति रुग्ण खर्च करूनही निकृष्ट जेवण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदारांच्या संस्थांची नावे स्मार्ट सारथीवर जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

व्यवसायांवरील निर्बंध हटविण्याची मागणीआकुर्डीतील खंडोबामाळ चौकात आंदोलकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन भर पावसात निदर्शने करून आंदोलन केले. शहरातील हातगाडी, पथारी व्यावसायिक तसेच पोळीभाजी सेंटर इत्यादी सेवा व्यवसायांवरील निर्बंध हटवा, घरकामगारावरील अघोषित निर्बंध टाकलेल्या शहरातील सर्व सोसायटीच्या व्यवस्थापन समित्यांना निर्बंध हटवण्याचे अधिकृत आदेश द्यावेत. शिक्षण शुल्क सक्ती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायfraudधोकेबाजीHealthआरोग्य