शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा चुराडा,  पाणीपुरवठा विभागातील ढिसाळ कारभाराचा नागरिकांना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:28 IST

पाणीपुरवठा विभागातील ढिसाळ कारभाराचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसताना देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर वर्षी साडेअठरा कोटींची चुराडा होत आहे.

- विश्वास मोरे  पिंपरी : पाणीपुरवठा विभागातील ढिसाळ कारभाराचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसताना देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली दर वर्षी साडेअठरा कोटींची चुराडा होत आहे. अधिकारी, प्रशासनाकडून जनतेच्या तिजोरीवर टाकल्या जाणाºया आर्थिक दरोड्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.पवना धरणातून येणा-या पाण्यावर शहराचे नियोजन केले जाते. दररोज ४७० एमएलडी पाणी शहरासाठी आवश्यक आहे. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथीलजलउपसा केंद्रातून महापालिकेच्या टाक्यांत आणले जाते. तेथून जलवाहिन्यांद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते.पिण्याचे पाणी उचलणे आणि घरापर्यंत पोहोचविणे यासाठी होणारा खर्च अधिक आहे. पिण्याच्या पाण्यावर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून वसूल होणारी रक्कम यात तफावत आहे. त्यात दर वर्षी देखभाल-दुरुस्तीच्या नावावर साडेअठरा कोटी खर्चाची भर पडत आहे. शहराला समांतर पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडा सिस्टीमद्वारे यंत्रणेवर कोट्यवधी रुपये खर्च केले; तसेच मीटर पद्धती लागू करून कोट्यवधी रुपयांचे पाणी मीटर विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून जादा दराने खरेदी केले़ पाणीगळती टाळण्यासाठी याअगोदर ४० टक्के विभागासाठी १४२ कोटी रुपये खर्च केला़ प्रस्तावित निविदेनुसार उर्वरित ६० टक्के भागासाठी २४० कोटी रुपये खर्च करणार आहेत़ घरगुती नळजोड बदलण्याबरोबरच पाइपलाइन बदलण्याचा खर्चआहे़ या अगोदर केलेला खर्च व प्रत्यक्षात आजतागायत केलेला खर्च पाहता पाणीगळतीचे प्रमाण कमी झाले नाही.\८९ हजार मिळकतींची भर४सन २०१२ची लोकसंख्या लक्षात घेता ४७० एमएलडी पाणी आरक्षित होते. पवना धरणातून तेवढेच पाणी उचलले जात आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या आकडेवारीनुसार ८९ हजार ३९२ सदनिकांची भर पडली आहे. त्यानुसार किमान चार लाख ४६ हजार ९६० नागरिकांची भर पडली आहे. लोकसंख्येनुसार आता ५०६ एमएलडी पाण्याची आवश्यकता असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. लोकसंख्या आणि पाणी पुरवठा यामधील तफावतीमुळे पाण्याचा तुटवडा भासत आहे.असा होतो खर्च४पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्ती या लेखाशीर्षाखाली वीजबिलावर ३४.७० कोटी, आस्थापनेवर २०.८५ कोटी, देखभाल-दुरुस्तीवर १८.४५ कोटी, अशुद्ध पाणी आकारावर ११.३८ कोटी, एमआयडीसी पाण्यासाठी ९.२३ कोटी, आॅईल आणि केमिकल यावर २.५१ कोटी, तसेच इतर व इंधन खर्चासाठी २.८१ कोटी असा एकूण १०९.५२ कोटी खर्च होत आहे. देखभाल-दुरुस्तीचा खर्च कमी केल्यास पाणीपट्टी वाढ लादण्याची गरज भासणार नाही.दीडशे एमएलडीची गळती४महापालिकेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी भाजपाच्या पाठिंब्यावर प्रशासनाने पाणी दर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या पाणीपट्टी वाढीस सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला. ३८ टक्के पाणीगळती होत आहे. पाणीचोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा होईपर्यंत ३८ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीगळती होते़ हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असून, जवळपास १५० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.थकबाकीचे प्रमाण वाढतेय४पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि वसुली यात तफावत आहे. शहरात एकूण नळजोडांची संख्या १ लाख ४५ हजार एवढी असून, अनधिकृत नळजोडांची संख्या अधिक आहे. सन २०१५नंतरची अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यांचे नळजोड अनधिकृत आहेत. त्यांची नोंद नसल्याने पाणीपुरवठ्यावर भार पडत आहे. पाणी चोरी आणि गळतीचे प्रमाण ३४ टक्के असून, गळतीचे प्रमाण रोखण्याची आवश्यकता आहे.... तर होईल साडेआठ कोटींची बचत४महापालिका पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्तीसाठी १८ कोटी ४५ लाख रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे या देखभाल-दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करावी.दोषींवर कारवाई करावी. त्याचबरोबर देखभाल-दुरुस्ती खर्चाच्या बाबीचे पुनरावलोकन होऊन हा खर्च नियंत्रित करावा. महापालिका ४७० एमएलडी अशुद्ध पाणी उचलण्यासाठी जलसंपदा विभागास ११ कोटी रुपये अदा करते, तर एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी उचलण्यासाठी पालिका सव्वानऊ कोटी खर्च करते. त्यानुसार जलसंपदाच्या पाण्यासाठी पालिका २.४२ लाख रुपये प्रत्येक एमएलडीसाठी देत आहे.४एमआयडीसीकडून येणाºया पाण्यासाठी ३१.२६ लाख रुपये प्रत्येक एमएलडीसाठी दिले जात आहेत. त्यामुळे पालिकेने एमआयडीसीऐवजी जलसंपदाकडून पाणी उचलावे. त्यामुळे पालिकेच्या ८.५० कोटी रुपयांची बचत होईल. देखभाल-दुरुस्तीवर झालेल्या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी. दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी. एमआयडीसीकडून पाणी घेण्याऐवजी थेट पाणी उचलावे, अशीमागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Waterपाणी