शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागरिकहो, दलालांपासून सावध राहा! थेट अधिकाऱ्यांशी संपर्काचे पीएमआरडीएतर्फे आवाहन

By नारायण बडगुजर | Updated: February 5, 2025 17:29 IST

पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात काही आर्किटेक्ट आणि मध्यस्थी व्यक्ती नागरिकांना परस्पर भेटून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून दिशाभूल करत आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली कामे थेट संबंधित विभागाकडून करून घ्यावीत, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात येत आहे.पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत असतात. यात प्रामुख्याने बांधकाम परवानगी, जमीन मालमत्ता आणि अनधिकृत बांधकाम विभागासह इतर ठिकाणी नागरिक आपल्या कामांसाठी येतात. मात्र, काही आर्किटेक्ट, अन्य मध्यस्थी व्यक्ती जागा मालकाला परस्पर गाठून तुमची कामे आम्ही करून देतो, असे सांगून त्यापोटी आर्थिक मागणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र, अशा प्रकारे पीएमआरडीएमध्ये कुठलीच कामे होत नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः आपल्या कामासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, एजंट किंवा इतर मध्यस्थी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रcivic issueनागरी समस्या