चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:12 AM2018-10-30T03:12:14+5:302018-10-30T03:12:52+5:30

चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chuckling kills the young man | चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण

चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण

googlenewsNext

पिंपरी : चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन उमेश गायकवाड (वय १९), दादा अशोक कांबळे (वय २६), अक्षय फुले (वय २५, सर्व रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी किरण महेंद्र मोरे (वय १९, रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हे मोरवाडी येथील श्रीमती यमुनाबाई मारुतीराव वाघेरे पाटील बालउद्यान येथे वॉकिंग करीत होते. दरम्यान, कुंदन गायकवाड त्याठिकाणी आला. ‘काय रे तू आमच्या चुगल्या लावतोस का?’ असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी इतर तीन आरोपींनीही मोरे यांना हाताने व लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुंदन गायकवाड याने पुन्हा ब्लेडने मोरे यांच्या कपाळावर आणि हातावर वार केले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही चोरी, लुटमार, हाणामारी आदी घटना कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. यावर पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Web Title: Chuckling kills the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.