शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रंग खेळत असलेल्या कामगाराच्या पाठीवर चॉपरसारख्या हत्याराने वार; निगडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:23 IST

कामगार रंग खेळत होते त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला.

पिंपरी : रंग खेळत असलेल्या कामगारांच्या पाठीवर चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार केला. तसेच दुसऱ्या प्रकरणात दारू पीत असल्याबाबत विचारणा केल्याने दगड मारून जखमी केले. दोन्ही प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटास्कीम, निगडी येथे सोमवारी (दि. २९) हा प्रकार घडला.

पहिल्या प्रकरणात भीमा दत्ता कांबळे (वय २७, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर सुरेश हिरनाईक (वय २२), सविता सुरेश हेअर नाईक (वय ४०), देवकी सुरेश हिरा नाईक (वय १९, तिघेही रा. मिलिंद नगर, ओटास्किम, निगडी), अजय चौधरी, रोहित सोनवणे, राहुल, कुणाल, नीलबा (सर्वांचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कामगार रंग खेळत होते. त्या कारणावरून आरोपी भीमा कांबळे याने कामगार विकास गजभिव यांच्या पाठीवर लोखंडी चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार केले. तसेच सागर गजभिव व अमोल पंचमुख  यांच्याशी आरोपींनी झोंबाझोंबी केली. सागर याच्या तोंडावर दगड मारून शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी झालेली भांडणे सोडण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ गेला असताना त्याच कारणावरून रात्री आठच्या सुमारास आरोपी दोन रिक्षांमधून आले. आरोपींनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांचा भाऊ राकेश यांना लोखंडी चॉपर सारख्या धारदार हत्याराने व दगडांनी मारहाण करून जबर दुखापत केली. 

दुसऱ्या प्रकरणात सविता सुरेश हिरीनाईक (वय ३९, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश कांबळे (वय २१), भीमा कांबळे (वय ३६), सागर गजभिव (वय २७), सुनील कांबळे (वय ४०), अनिल कांबळे (वय ४२, सर्व रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या घराशेजारी राहतात. आरोपी दारू पीत बसले होते त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याबाबत विचारणा केली असता आरोपींना राग आला. त्या रागातून त्यांनी दगड मारल्याने फिर्यादीचा मुलगा अमर याच्या डोक्याला जखम झाली. तसेच फिर्यादीचे पती व मुलगी देवकी यांना दगड मारल्याने मुका मार लागला आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLabourकामगार