शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

चिंचवड हा शहरीभागातील सर्वांत मोठा मतदार संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 6:52 PM

मतदार संघात ५४ विभागीय अधिकारी आणि कार्यालयासाठी आता अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत.

ठळक मुद्देविधानसभेच्या अर्जाची प्राधिकरण कार्यालयातून वाटप, स्वीकृती : निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दैनंदिन कामकाज थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातून होणार असून अर्जचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप, मतपत्रिका छपाई आकुर्डीर्तल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावरुन होणार आहे, तर चिंचवड मतदार संघ  शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे, अशी माहिती चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकरी मनिषा कुंभार यांनी दिली.विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार असून शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीची माहिती कुंभार यांनी दिली.  चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय थेरगाव येथील महापालिका शाळेत आहे. मनिषा कुंभार म्हणाल्या,  शहरी भागातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ असून ५  लाख १६ हजार ८३६  एकूण मतदार आहेत. त्यामध्ये २ लाख ४५ हजार ४८६ पुरुष तर २ लाख ४१ हजार ३१८ महिला आणि ३२ इतर मतदार आहेत. 

नवीन मतदार वाढलेलोकसभा निवडणूकीनंतर  तीन महिन्यात १४ हजार ९६ नव मतदारांची वाढ झाली आहे. पुरवणी मतदारयादी चार आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. नवमतदारांची संख्या वाढली आहे, असे कुंभार यांनी सांगितले. 

दिव्यांगासाठीही मतदान केंद्रचिंचवड मतदारसंघात ४३९ मतदान केंद्र असणार आहेत. सहाय्यकारी मतदान केंद्रे ५२ आहेत.  ५९ खासगी इमारती आणि ३१ सरकारी इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २९ आणि दुस-या मजल्यावर १५ मतदान केंद्रे असणार आहेत. त्याठिकाणी लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी तळमजल्यावर ६५१ मतदान केंद्रे असणार आहेत. मोकळ्या मैदानावर, पार्किंगमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. 

भरारी पथक तैनातमतदार संघात ५४ विभागीय अधिकारी आणि कार्यालयासाठी आता अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना व्होटर स्लिप वाटपण करणे, मतदान केंद्राची सद्यस्थिती, आकडेवारीची माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. खर्च, तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. प्रचाराच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना असणार आहे. भरारी, व्हिडीओ सर्व्हिलन्स, स्टॅटेस्टिक पथके तैनात असणार आहेत. चार निरीक्षक असणार आहेत. चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठी एकच निरीक्षक असतील, असेही कुंभार म्हणाल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक