बालिकांवर अत्याचाराचे सत्र, कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 12:57 AM2018-10-04T00:57:08+5:302018-10-04T00:57:32+5:30

उद्योगनगरीत एकाच दिवशी दोन घटना : शेजारी, निकटवर्तीयांच्या वासनांची शिकार

Child abuse session, girls do not feel safe in the family too | बालिकांवर अत्याचाराचे सत्र, कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षित

बालिकांवर अत्याचाराचे सत्र, कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षित

googlenewsNext

पिंपरी : कासारसाई येथे मजुरांच्या कुटुंबातील दोन मुलींवर त्याच परिसरात राहणाऱ्या नराधमांनी अत्याचार केला. त्यात एका मुलीचा जीव गेला. ही संतापजनक घटना ताजी असताना, चिंचवड आणि निगडी पोलिसांकडे बुधवारी एकाच दिवशी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. कधी घरातील, नात्यातील वासनांध व्यक्ती, तर कधी शेजाºयांच्या अत्याचाराला बळी पडणाºयांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या महिन्याभरात उद्योगनगरीत चार ते पाच घटना घडल्या आहेत. हे सत्र थांबलेले नसून, चिंचवडमध्ये बुधवारी एका दिवशी दोन घटना उघडकीस आल्या.

तडीपारीच्या कारवाईचा भंग करून शहरात आलेल्या उच्चप्पा मंगळूर या गुंडाने भूत असल्याची भीती दाखवत अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला. घराबाहेर खेळणाºया मुलीही सुरक्षित नाहीत, हे मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेतून अधोरेखित झाले आहे. वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अधिक प्रमाणात घडू लागल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी एका आयटी अभियंत्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. काही कालावधी उलटला नाही तोच, याच हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दगड कापण्याचे यंत्र हवे असल्याचा बहाणा करून एका तरुणाने पाहुण्या आलेल्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना भरदिवसा पवारनगर, थेरगाव येथे घडली होती. वाकडमध्ये दीड महिन्यापूर्वी आरोपीने घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला. आरोपीने तिच्या आईला ढकलून अल्पवयीन मुलीवर आरोपीने अतिप्रसंग केला.

कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षित
जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन कर्णबधिर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पीडित मुलीची आई घरकाम करण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडत असे. दिवसभर घरात कोणी नसल्याने गैरफायदा उठवीत आरोपीने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. सलग सात-आठ महिने सुरू असलेले पित्याचे गैरकृत्य उघडकीस आले. बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र कधी रोखले जाणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Child abuse session, girls do not feel safe in the family too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.