शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री डिसेंबरमध्ये करणार नव्या आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:03 IST

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या इमारतीचे उद्घाटन करून नव्या आयुक्तालयाची सुरवात होईल याची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देचिंचवड मधील नव्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यातआयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना नवीन आयुक्तालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही

चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन आयुक्तालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचे काम अंतिम टप्यात आले आहे.डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते नव्या इमारतीत प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.यामुळे आयुक्तालयाच्या इमारतीत लवकरच कामकाज सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चिंचवड मधील प्रेमलोकपार्क मध्ये नवीन आयुक्तालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,विधिसमिती अध्यक्षा माधुरी कुलकर्णी, नगरसेवक नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्षा, नगरसेविका करुणा चिंचवड यांच्या सह प्रधासनाच्या विविध विभागातील अधिकानीभेट दिली. नव्या आयुक्तालयाच्या कामाला वेग आला असून २५ नोव्हेंबरपर्यंत उर्वरित सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नव्या आयुक्तालयाच्या इमारतीचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.या इमारतीत नवीन बांधकाम,रंगरंगोटी,रस्ते,फर्निचर अशा विविध प्रकारची काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. इमारतीचे काम सुरू असल्याने १५ आॅगस्ट रोजी चिंचवड मधील आॅटो क्लस्टर मधील जागेत तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली.नवीन इमारतीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आयुक्तालयाचा पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन व अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी वेळोवेळी भेट देऊन कामाची पाहणी केली. आवश्यक असणारे बदल करण्यात आले असून हे काम आता अंतिम टप्यात आहे.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या इमारतीचे उद्घाटन करून नव्या आयुक्तालयाची सुरवात होईल याची तयारी सुरू झाली आहे.नवीन आयुक्तालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाऱ्यांना दिला होता. याच अनुषंगाने नवीन कर्मचारी व काही अधिकारी नव्या आयुक्तालयासाठी देण्यात आले आहेत. आता नव्या इमारतीत आयुक्तालयाचा कारभार सुरू होण्यासाठी थोडा अवधी राहिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड