शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मावळ जागेवरून युतीत वाद पेटणार : मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 04:42 IST

मित्र पक्षांनी मोदींना साथ  न दिल्यास मावळ आणि शिरूर मधून उमेदवार देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगडी येथे शिवसेनेला उद्देशून दिला.

पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा करण्यासाठी अटल संकल्प महासंमेलन नसून पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पाठींबा देणाऱ्या  मित्र पक्षाचा खासदार संसदेत पाठवू. मित्र पक्षांनी मोदींना साथ  न दिल्यास मावळ आणि शिरूर मधून उमेदवार देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगडी येथे शिवसेनेला उद्देशून दिला.

           शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. या मतदार सघांत लोकसभा निवडणूकीचा अटल संकल्प महासंमेलनाद्वारे नारळ भाजपाने फोडला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाची युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपाने शिवसेनेच्या जागांवर दावा केला आहे. अशी चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या गडाविषयी नेते काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती.

            युतीविषयी मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, ‘‘मावळ आणि शिरूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पिंपरी-चिंचवड शहरात होत असताना आम्ही शिवसेनेच्या जागांवर दावा करतोय का? अशी चर्चा रंगली होती. हा मतदार संघावर दावा करण्यासाठी मेळावा नाही. तेच खासदार आम्ही निवडून देऊ. जे मोदींना पाठींबा देतील. मोदींना पाठींबा देणाऱ्या मित्रपक्षाचाही खासदार निवडूण देऊ. मित्र पक्षांनी साथ न दिल्यास संसदेपर्यंत भाजपाचेच खासदार असतील. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हेच आमचे उमेदवार असतील. संसदेपर्यंत हेच प्रतिनिधी पाठवू.’’  असा गर्भित इशाराही शिवसेनेला दिला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmavalमावळShiv Senaशिवसेना