डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 19:11 IST2020-02-24T19:09:02+5:302020-02-24T19:11:45+5:30
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना कोणतेही बिल न देता औषध विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखली येथे देहू- आळंदी रस्त्यावर बुधवारी (दि. १९) हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (दि. २३) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण रामहरक जैस्वाल / रोहिदास (रा. मनपा शाळेजवळ, नेहरूनगर, पिंपरी), प्रकाश रामलाल चौधरी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि श्री नारायण राठोड (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन अशोक कांबळे (वय ४४, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करून विना खरेदी बिलाने औषध खरेदी केले. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.