चांदखेडच्या व्यापाऱ्याचे अपहरण अन् सुटका

By Admin | Updated: February 24, 2017 02:57 IST2017-02-24T02:57:59+5:302017-02-24T02:57:59+5:30

चांदखेड (ता. मावळ) येथील व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणातील सातपैकी तीन आरोपींना गुन्हा

Chandkhed merchant kidnapped and rescued | चांदखेडच्या व्यापाऱ्याचे अपहरण अन् सुटका

चांदखेडच्या व्यापाऱ्याचे अपहरण अन् सुटका

तळेगाव दाभाडे : चांदखेड (ता. मावळ) येथील व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणातील सातपैकी तीन आरोपींना गुन्हा घडल्यापासून अवघ्या
पंधरा तासात अटक करण्यात पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. व्यापाऱ्याची सुखरूप सुटका झाली.
या प्रकरणातील आरोपी शुभम शशिकांत गायकवाड (वय २२), ओंकार वसंत पांचाळ (वय २३ दोघेही रा. सोमाटणे, ता. मावळ) , सचिन सुनील शेफर्ड (वय २५ रा. नगर ) या तिघांना सोमाटणे फाटा परिसरात गुरूवारी अटक केली. पोलीस निरीक्षक राम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश होडगर, अंकुश माने, राजेश रामाघरे, पोलीस हवालदार राजेंद्र मिरघे, सुनील जावळे, दत्ता बनसोडे, गणेश महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.उद्या आरोपींना वडगाव न्यायालयात हजर करणार
असल्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Chandkhed merchant kidnapped and rescued