चाकणला दुचाकीचोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:48 IST2018-10-04T00:48:17+5:302018-10-04T00:48:48+5:30

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Chakan thieft arrest by police | चाकणला दुचाकीचोर गजाआड

चाकणला दुचाकीचोर गजाआड

चाकण : सराईतपणे दुचाक्या तसेच मोबाईल चोरणाऱ्या टोळक्याला चाकण पोलिसांनी चिंबळी फाट्यावरून जेरबंद केले आहे. चोरटे चिंबळी फाट्यावर मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याचे खबºयाकडून मिळताच पोलीस पथकाने सापळा लावून चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार विठ्ठल वाळुंज (वय २०), महादेव लक्ष्मण खिलारी (वय २२, दोघेही रा. चिंबळी गाव, ता.खेड ) व संदेश प्रभाकर पाटोळे (वय २०, रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून तळेगाव, चाकण व आळंदी हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चिंबळी, कुरुळी, महाळुंगे येथे कामगार वर्ग राहत असलेल्या परिसरातून दिवस टेहळणी करून रात्री कामगार झोपल्यानंतर घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करीत असल्याचे काबुल केले आहे. त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किंमतीचे १७ मोबाईल व २ लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाक्या जप्त केल्या आहेत.
 

Web Title: Chakan thieft arrest by police