कोरोना नियम उल्लंघन प्रकरणी उपमहापौरांच्या चिरंजीवासह ७० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:56 IST2021-03-25T23:56:29+5:302021-03-25T23:56:37+5:30
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौरांचे चिरंजिव चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोरोना नियम उल्लंघन प्रकरणी उपमहापौरांच्या चिरंजीवासह ७० जणांवर गुन्हा
पिंपरी : उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करणे भोवले असून उपमहापौर यांच्या चिरंजीसह सत्तर जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौरांचे चिरंजिव चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महापालिकेतील सुरक्षा परिवेक्षक दत्तात्रय बारकु भोर (वय ६०, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महापालिका भवनात २३ मार्चला उपमहापौर बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महापालिका प्रवेशद्वारावर नगरसेवक आणि कार्यकर्ते एकत्रितपणे उपस्थित होते. त्यांनी जल्लोष करून घोषणाबाजी केली. याबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.