शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:27 IST

केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले.

ठळक मुद्देबांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोरपिंपरी कॅम्पातील प्रकार : एक लाख ३० हजारांच्या बांगड्या केल्या होत्या लंपास

पिंपरी : एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार पिंपरी कॅम्प येथे दि. २ डिसेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी वयोवृद्ध महिलेची केअरटेकर असलेल्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना सुरेश उत्तेकर (वय ४०, रा. रूपीनगर, निगडी) असे आरोपी केअरटेकर महिलेचे नाव आहे. पोलिसांनी उत्तेकर हिला अटक केली आहे. पिंपरी कॅम्प येथे ग्यानीबाई मुलचंद रामनानी (वय ८८) यांची केअरटेकर म्हणून आरोपी उत्तेकर या काम करीत होती. उत्तेकर दि. २ डिसेंबर रोजी ग्यानीबाई यांच्या घरी कामावर होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्यानीबाई झोपल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती एलआयसीचे पैसे भरण्याचे निमित्त करून घरात आला. झोपलेल्या ग्यानीबाई यांच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या एक लाख ३० हजारांच्या दोन बांगड्या अनोळखी व्यक्ती चोरून घेऊन गेला, अशी फिर्याद उत्तेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली होती.  पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस निरीक्षक अशोक निमगिरे, हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, पोलीस नाईक श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, पोलीस कर्मचारी शहाजी धायगुडे, गणेश करपे, रोहित पिंजरकर, उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कर्ज फेडण्यासाठी केला चोरीचा बनावपोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, फिर्यादी रंजना उत्तेकर हिने सांगितलेल्या हकिगतबाबत साक्षंकता वाटू लागली. तसेच उत्तेकर हिने फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे कोणताही प्रकार झाल्याचे आठवत नाही, असे ग्यानीबाई यांनीही पोलिसांना सांगितले. त्यामुळे आरोपी उत्तेकर हिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्याकरीता चोरीचा बनाव केल्याचे उत्तेकर हिने सांगितले. पोलिसांनी सोन्याच्या दोन बांगड्या तिच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीGoldसोनंPoliceपोलिसArrestअटक