उमेदवारांनी केला बांधावर प्रचार

By Admin | Updated: February 14, 2017 01:59 IST2017-02-14T01:59:40+5:302017-02-14T01:59:40+5:30

प्रचारासाठी वाकड-ताथवडे-पुनावळे या प्रभाग २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी थेट शेतात जाऊन शेतमजूर मतदारांची भेट घेतली.

Candidates campaign on banana bandh | उमेदवारांनी केला बांधावर प्रचार

उमेदवारांनी केला बांधावर प्रचार

पिंपरी : प्रचारासाठी वाकड-ताथवडे-पुनावळे या प्रभाग २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी थेट शेतात जाऊन शेतमजूर मतदारांची भेट घेतली. वाकड येथील विनोदेनगर परिसरातील शेतमजुरांना या वेळी प्रचारपत्रके वाटप करून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी उमेदवार राम वाकडकर, विशाल कलाटे, सीमा आल्हाट आणि भाजपापुरस्कृत अधिकृत उमेदवार ज्योती ओव्हाळ यांच्यासह सनत देसाई, गणेश पारखे, अनिल भुजबळ, राहुल भुजबळ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब विनोदे आदी उपस्थित होते. भाजपाचे हे उमेदवार शेतकरी कुटुंबांतील आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांची या उमेदवारांना जाण आहे. भाजपा उमेदवार थेट शेतात आल्याने शेतमजुरांनी समाधान व्यक्त केले. भाजपाला मतदान करण्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘आयटी हब’सह बहरलेली शेती असा हा परिसर आहे. गर्भश्रीमंत आणि उच्च राहणीमान असलेले मतदार आणि दुसरीकडे शेतमजूर असलेले मतदार अशी संमिश्र परिस्थिती या प्रभागात आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक समाज घटकाच्या समस्यांचे स्वरूप वेगळे आहे. या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates campaign on banana bandh