शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खंडणीसाठी विमानाने आले...पोलिसांच्या गाडीतून थेट कोठडीत गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 20:02 IST

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पिंपरी येथे घडली. एकुलत्या एक मुलीचे अपहरण करून पाच लाखाची खंडणी वसूल करत धूम ठोकायचा प्लॅन त्यांनी केला. मात्र .. पैशांऐवजी त्यांच्या हाती पोलिसांच्या बेड्याच पडल्या.

ठळक मुद्देपाच लाखांची खंडणी मागणारे दोन आरोपी जेरबंदवेषभूषा केलेले सहा अधिकारी आणि ४० पोलिसांचे खास पथक तैनात

पिंपरी : फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकडपोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. खंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात आणि खासगी मोटार भाड्याने घेऊन काळेवाडी भागात आलेले दोन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. बीटेकपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या दोन खंडणीबहादरांना पोलिसांनी वेशांतर करून अत्यंत कौशल्याने पकडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित विनोद यादव (वय २८, रा. दिल्ली) आणि अभिनव सतीश मिश्रा (वय २७, रा. दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड परिसरात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाची माहिती या आरोपींनी फेसबुकवरून मिळवली. या कुटुंबातील २१ वर्षांची मुलगी आयटी कंपनीत नोकरी करते. ती घरातून किती वाजता बाहेर पडते. किती वाजता कामावरून परत घरी येते. याबद्दलची माहिती मिळवली. शिक्षणासाठी काही वर्षे पुण्यात राहिले असल्याने त्या सोसायटीची माहिती त्यांनी मिळवली होती. या माहितीच्या आधारे आरोपींनी मुलीच्या आईला १९ सप्टेंबरला मोबाइलवरून संपर्क साधला. त्यांच्या मुलीबद्दल सर्व माहिती असल्याचे सांगितले. या मुलीचे अपहरण करून बरे वाईट करू शकतो, अशी भीती दाखवून पाच लाखांच्या खंडणीची मागणी त्यांनी केली. या कुटुंबियांना पाच लाख रुपये रक्कम मोठी नाही़ ते पोलिसांना कळविणार नाहीत. सहज आपले इप्सित साध्य होईल, असे त्यांना वाटले. उच्चशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांनी याबाबतचा तांत्रिक पुरावा राहू नये, याची काळजी घेतली होती. मुलीच्या आईशी संपर्क साधताना ते सार्वजनिक दूरध्वनी सेवेचा वापर करत होते. १९ सप्टेंबरपासून ते २१ सप्टेंबरपर्यंत सातत्याने मुलीच्या आईकडून खंडणीची रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. या प्रकाराबद्दल संबंधित महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली. वाकड पोलिसांनी त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी व्यूहरचना आखली. खंडणीची रक्कम घेऊन येण्यासाठी आरोपी रेल्वे स्थानक अथवा विमानतळ येथे यावे, असा आग्रह धरत होते. सार्वजनिक ठिकाणी आरोपींना ओळखणे आणि पकडणे कठीण असल्याने पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माध्यमातून त्यांना काळेवाडी, वाकड परिसरात येण्यास भाग पाडले. खंडणीची रक्कम नेण्यासाठी ते ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी वेशांतर केलेल्या पोलिसांचे पथक तैनात होते. आरोपी रक्कम नेण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना पकडले................... फिल्मीस्टाईलने आरोपी जेरबंदखंडणीची रक्कम नेण्यासाठी येणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सहा अधिकारी आणि ४० पोलिसांचे खास पथक तयार केले होते. ज्या ठिकाणी आरोपी येणार त्या परिसरात हातगाडीजवळ फळविक्रेत्याची वेषभूषा केलेला एक पोलीस,पानटपरीजवळ साध्या वेषात थांबलेले काही पोलीस कर्मचारी,डॉक्टरची वेषभूषा केलेली महिला पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर साध्या वेषातील काही पोलीस असलेली रूग्णवाहिका घेवून आरोपींच्या प्रतिक्षेत पोलीस पथके तैनात होती. काळेवाडी फाटा येथील एका सोसायटीच्या आवारात खंडणीची रक्कम नेण्यासाठी आरोपी आले. अत्यंत सावधपणे ते तेथे वावरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच फळविक्रेत्याच्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्याने त्यातील एकाला रिक्षात बसत असतानाच पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून असे आणखी काही प्रकार त्यांनी केले आहेत का? याची चौकशी केली जात असल्याचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हॉटसअ‍ॅप,फेसबुकवर वैयक्तिक माहिती टाकल्यास त्याचा दुरूपयोग होऊ शकतो. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकण्याबाबतची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. असे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwakadवाकडPoliceपोलिसKidnappingअपहरणArrestअटक