शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

सामान्यांच्या घरावर बुलडोजर, भाजपाच्या बांधकामांना अभय; पिंपरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 3:50 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिले होते पुरावेप्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर करीत आहेत जुलूम : सचिन साठे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोजर फिरविला जातो. तर, दुसरीकडे कारवाई करण्याची मागणी करुनही भाजप कार्यकर्त्यांच्या अनधिकृत दुकानांवर, घरांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप, शहराध्यक्ष साठे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या दुटप्पीपणाचा त्यांनी तीव्र निषेध केला.  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर शहरात विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या नातेवाईकांच्या बांधकामांवर करवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जगताप यांनी महापालिका प्रशासनास पुरावे दिले होते. त्यानंतर प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. नवी सांगवी पाठोपाठ कारवाई सुरू केली. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी लावली होती. 

गोरगरिबांच्या घरावर हातोडा, काँग्रेसकडून निषेधपिंपळेगुरव, सांगवी परिसरातील भाजप नेते, लोकप्रतिनिधींच्या व्यावसायिक बांधकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांची बांधकामे शाबूत ठेवून सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर बुलडोझर फिरविला जात आहे. महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा, गंभीर आरोप राजकीय पक्षांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाचे पुरावे दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. पिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरविला जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करुन, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलख विशालनगरमधील बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नाही. हे दुकान भाजपकडून निवडणूक लढविलेल्या एका व्यक्तिच्या मालकीचे असल्यानेच तक्रार करुनही कारवाई होत नसल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषदेत उघडकीस आणली. शहराध्यक्ष साठे म्हणाले, की महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. प्रशासनास हाताशी धरून सत्ताधारी नागरिकांवर जुलूम करीत आहेत. महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही. केवळ गोरगरिबांच्या घरांवर हातोडा चालवित आहे. विशालनगरमधील एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे बांधकाम करून त्यात वाईन शॉप सुरू केले आहे. तक्रार करूनही महापालिका प्रशासन पाठीशी घालत आहे. प्रशासनाच्या या कारवाईतील दुजाभावाचा आम्ही निषेध करतो.

टॅग्स :shravan hardikarश्रावण हर्डिकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा