शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर मस्त अन् असुविधांनी नागरिक त्रस्त, ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ प्रकल्प आता झाला नकोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 16:16 IST

पंचतारांकित अ‍ॅमिनिटीची स्वप्ने दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोशी येथील ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’या प्रकल्पातून सदनिकाधारकांची फसवणूक केली जात आहे.

ठळक मुद्देप्यायला पाणी नाही, सोलर सिस्टीम आणि गॅसची पाईपलाईन बसवलेलीच नाहीविविध समस्यांनी येथील सदनिकाधारक ग्रासले

पिंपरी : पंचतारांकित अ‍ॅमिनिटीची स्वप्ने दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोशी येथील ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’या प्रकल्पातून सदनिकाधारकांची फसवणूक केली जात आहे. ताबा मिळाल्यानंतरही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. प्यायला पाणी नाही, सोलर सिस्टीम आणि गॅसची पाईपलाईन बसविलेलीच नाही. स्विमिंग पूल, गार्डन आणि मंदिर हे माहितीपुस्तकातच आहे. विविध समस्यांनी येथील सदनिकाधारक ग्रासले आहेत. त्यामुळे ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ आता येथील नागरिकांना नकोसा झाला आहे. ऐश्वर्यंम म्हणजे वैभव. मात्र, नाव मोठं लक्षण खोट...हे या प्रकल्पावरून दिसून येतं.  

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चिखली गट क्रमांक ९४ मध्ये ‘‘द होम ऑफ कम्युनिटी लिव्हींग या गोंडस नावाखाली एश्वर्यंम हमारा प्रकल्प एक आणि प्रकल्प दोन साकारला जात आहे. एकूण १३ इमारतींचा प्रकल्प असून त्यापैकी ६ इमारतीमध्ये नागरीक राहायला आले आहेत. या प्रकल्पाची सुरूवात २०१७ मध्ये करण्यात आली. २१३२ सदनिकांचा हा प्रकल्प आहे. १०२० सदनिका नागरिकांच्या ताब्यात दिल्या आहेत. तसेच पीपीपी तत्वावर महापालिकेच्या भागिदारीतून ८२२ सदनिका दिल्या जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पांत सुविधांचा प्रचंड अभाव असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांमध्ये चीड

उच्च जीवनशैलीवर आधारित स्वस्त घरकुल अशी जाहिरातबाजी या प्रकल्पात करण्यात आली आहे. लोकमतच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, तसेच येथील रहिवाश्यांशी संबंधित चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक येथील नागरिकांच्या भावनांशी खेळल्याने प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून आले. काय दिले आश्वासन

प्रकल्पांच्या माहितीपत्रकात १३ प्रकारांच्या अ‍ॅमिनीटी दाखविल्या असूून त्यात कॉॅमन अ‍ॅमिनिटी मध्ये स्केटींग रिंग, चेस बोर्ड, टद्बायसिकल पार्क, कम्युनिटी हॉल, पार्टी लॉन, बारबेक्यू काऊंन्टर, फुड सर्व्हिंग एरिया, हर्बल गार्डन, रूंद पाथवे, मिडीटीशेन पॅव्हेलिन, योगा लॉन दिले आहे. तर इतर अ‍ॅमिनिटीमध्ये नक्षत्र गार्डन, मेडीटेशन हॉल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्न प्ले पार्क, ट्री पीट, मल्टीपर्पज ओपन कोर्ट अ‍ॅडव्हेंचर वॉल, जिम्नेशियम हॉल, स्विमिंग पूल, कीडस् पूल, आऊटडोअर शौवर, आऊटडोअर गेम, ओपन स्पेस, नाना - नाणी पार्क, गॅस पाईपलाईन अशा अ‍ॅमिनिटी देणार असल्याचे आश्वासन दिले होत.

कोणत्या गोष्टींचा अभाव

सोलर पॅनल दिले नाहीत. गॅसची पाईप लाईन नाही. स्वीमींग पूल अर्धवट आहे. गार्डन, मंदिर पूर्ण नाही. पार्किंगमध्ये वीज नाही. पूर्णत्वाचा दाखला नसल्याने पिण्याचे महापालिकेचे पिण्याचे पाणी नाही. तसेच वॉटर ट्रिटमेंट प्लॉन आणि मैला शुद्धिकरण प्रकल्पाचा अभाव. पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जाते.

टॅग्स :PuneपुणेChikhliचिखलीbusinessव्यवसायSocialसामाजिक