शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बीआरटीएसची लागली वाट, बॅरिकेड गेले चोरीला; रस्त्यावर पसरली खडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:28 IST

पिंपरी : शहरातील बीआरटीएस कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता कायम आहे. त्यामुळे बीआरटीचा खर्च पाण्यात जाणार की काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

पिंपरी : शहरातील बीआरटीएस कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता कायम आहे. त्यामुळे बीआरटीचा खर्च पाण्यात जाणार की काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटीएस मार्गात रस्त्याची, बसथांब्यांची, लोखंडी जाळ्यांची मोडतोड होऊन वाट लागली आहे. दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग असून यावर ३२ थांबे आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स बसविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बसथांबेही पूर्वीच बांधण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडलेले बसथांबे खराब झाले आहेत. काही ठिकाणी बसथांबे दुरुस्तीचे काम सुरू आहे.फुगेवाडी येथे बसथांब्यावर खोदाई करण्यात आली आहे. कुंदननगर येथील बसथांबा नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. बॅरिकेड्सदेखील काही ठिकाणी वाहनांच्या धडकेने तुटलेले आहेत. बसथांबे दुरुस्त केले, तरी पुन्हा एकदा बसथांब्याचा फरश्या तुटल्या आहेत. बीआरटीची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. परंतु तो मुहूर्त टळला असून आता बीआरटी कधी होणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे.वाहनचालक झाले त्रस्तकिवळे : किवळे -सांगवी बीआरटी रस्ता किवळे ते रावेत दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विविध विभागांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त आहेत. मुख्य व बीआरटी रस्त्यावरील अडथळे, बसथांब्यांचेसताड उघडे दरवाजे, कमालीची अस्वच्छता, विविध ठिकाणी खचलेला रस्ता ,पांढरे पट्टे पुसत झालेले व अधिक उंचीचे गतिरोधक, पदपथावरील अडथळे व अतिक्रमणे, चौकांचे रखडलेले सुशोभीकरण याकडे महापालिकेचे दोन वर्षांत झालेले दुर्लक्ष यामुळे हा रस्ता अत्यंत असुरक्षित व धोकादायक बनला असल्याचे लोकमतने बुधवारी सकाळी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.किवळे ते सांगवी बीआरटी मार्गावर पाच सप्टेंबर २०१५ पासून म्हणजेच गेल्या २५ महिन्यांपासून बससेवा सुरु झाली आहे. मात्र किवळे ते रावेत दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना बीआरटी मार्गासह इतर वाहनांसाठी वापरात असणाºया शेजारच्या रस्त्याची विविध ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रावेत गाव, तसेच पंपिंग स्टेशन बसथांब्याजवळच्या भागातील रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. भोंडवेवस्ती नजीक मुख्य रस्ता दोन ठिकाणी खचला असल्याने वाहने आदळतात.किवळेकडून रावेतकडे जाताना व येताना संपूर्ण विविध ठिकाणी नव्याने पथदिवे हटवून रस्ता रुंदीकरण केलेल्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत. रस्त्याच्या पदपथावर अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य व मातीचे ढीग पडले आहे. दोन्ही बाजूंकडील रस्त्यावरील माती व खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. रस्त्यावर व गतिरोधकावर अनेक ठिकाणी मारलेले पांढरे पट्टे फिक्के झाले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधक दिसत नाहीत. काही गतिरोधक निकषाप्रमाणे तयार करण्यात आले नसल्याने वाहनांना घासून अपघात होत आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात रस्त्यावर लावलेल्या रबरी पट्ट्या निघाल्या आहेत. पावसाळी गटार व्यवस्था असतानाही पावसाचे पाणी गटारीत जात असल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यालगत पाण्याची तळी साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाकडे ये -जा करण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. वाहनांच्या वेगावर व शिस्तीवर नियंत्रण राहिले नाही. निष्काळजीपणे व बेभानपणे वाहने हाकली जात आहेत. चिंचवड स्टेशन येथून होणारी बेकायदा वाहतूक याचमार्गे होत आहे.पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठीकोणाचीही पर्वा हे वाहनचालक करीत नाहीत. किवळे ते रावेत दरम्यान पुढे गाव आहे, वळण रस्ता, धोक्याचा इशारा देणारे दिवे ,रेडियम पट्ट्या लावलेल्या नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पहिल्या लेनवर व लोखंडी जाळ्यांजवळ मातीचा थर साचलेला आहे. सर्वच लोखंडी जाळ्या गेल्या दोन वर्षांत स्वच्छ केल्या नसल्याने घाणेरड्या दिसत आहेत. वेगमर्यादा पाळण्याबाबत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्त्याची व पदपथांची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने संपूर्ण रस्त्याच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे.वाहनांची गती कमी करण्यासाठी सर्वाधिक वर्दळीच्या मुकाई चौकाजवळ दोन गतिरोधक बनविणे गरजेचे आहे. किवळेतील मुकाई चौक व रावेत शिंदे वस्तीकडे जाणाºया चौकाजवळ वर्तुळाकार वाहतूक होत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. येथील दोन्ही चौकांचे सुशोभीकरण व सुधारणा होणे गरजेचे असून दोन्ही चौकांत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविणे गरजेचे आहे.- संकलन : योगेश्वर माडगूळकर,देवराम भेगडे