शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad Crime| अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन; सोशल मीडियावर थिल्लरपणातून ‘भाईगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 10:42 IST

सोशल मीडियाचा अनाठायी वापर वाढल्याने रिल्स, शाॅर्ट व्हिडिओ करून थिल्लरपणा केला जात आहे...

नारायण बडगुजर

पिंपरी : धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ तयार करून काही जणांकडून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. अशा थिल्लरपणातून ‘भाईगिरी’ करण्याकडे कल वाढला आहे. शेअर, लाईक, फालोअर्स वाढविण्यासाठी हा खटाटोप असून, त्यासाठी अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन करण्यापर्यंत सारेकाही केले जाते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी नुकतेच काही गुन्हे दाखल केले. एका क्लिकवर साॅफ्ट पाॅर्न उपलब्ध झाल्यासारखाच हा प्रकार असून, असामाजिक प्रवृत्ती त्यामुळे बळावत आहेत, असे मत व्यक्त करून समुपदेशक तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

ज्ञानवृद्धी तसेच माहितीची देवाण- घेवाण व्हावी यासाठी तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणावर भर दिला जातो. मात्र त्यासह मनोरंजनासाठीही त्याचा वापर केला जात आहे. यात निखळ मनोरंजन अपेक्षित आहे. मात्र मनोरंजनाच्या नावाखाली अनावश्यक व्हिडिओ, पोस्टचा मारा केला जातो. त्याचा पुढचा टप्पा म्हणून धमकी देणे, दहशत माजविणे अशा विविध गुन्हेगारीकृत्यांसाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

ना कंटेंट ना मनोरंजन

माहिती किंवा मनोरंजन अशा कोणत्याही प्रकारचा ‘कंटेंट’ नसलेले व्हिडिओ तरुणांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. त्यालाही हजारो, लाखो लाईक, शेअर्स, फालोअर्स मिळत आहेत. त्यामुळे अशा व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे फावत आहे.

सोशल मीडियाचा अनाठायी वापर वाढल्याने रिल्स, शाॅर्ट व्हिडिओ करून थिल्लरपणा केला जात आहे. अशा तरुणांचा घरच्यांशी असलेला संवाद कमी झाला आहे. त्यांना वेळीच सावरले पाहिजे. त्यासाठी त्यांचे समुपदेशन केले पाहिजे.- ॲड. संतोष मोरे, सदस्य, विधी व बालकल्याण समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

फॅमिली फॅब्रिक याला कारणीभूत आहे. पौगंडावस्थेतील मुले आयडेंटिटि क्रायसिसमधून जातात. या कालावधीत त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण होते. सोशल मीडियातून यात चुकीचा इन्फ्लू्यन्स आल्यास असे प्रकार घडतात. ज्यांना व्यक्त होण्याची संधी मिळालेली नाही, त्यांना हा प्लॅटफार्म वाटतो. मात्र हे क्षणिक आहे. असामाजिक प्रवृत्ती मुलांपेक्षा मुलींमध्ये वेगळी असते. असामाजिक प्रवृत्ती असलेल्या मुलांना थेट मारहाण करण्यात तर मुलींना ‘डायलाॅग’बाजी किंवा चुगली तसेच शिवीगाळ करण्यात रस असतो.  - डाॅ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम

सोशल मीडिया कंटेंट फिल्टरिंग केले पाहिजे. पोस्ट करण्याआधीच त्याचे सेन्सरिंग झाले पाहिजे. आक्षेपार्ह पोस्ट डीलीट करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. गुन्हेगारांनी आऊटसोर्स केल्यास तांत्रिक अडचणी वाढतात. परदेशातील पोस्ट करणाऱ्या वक्तीवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट, मजकूर, व्हिडिओ पुढची पिढी पाहणार आहे. त्यातून तुमचे व्यक्तीमत्व तुमच्या मुलांना व मुलींना कळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोस्ट विचारपूर्वक केली पाहिजे.- डाॅ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी