शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडीत थेरगावातील ७ वाहनांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 14:03 IST

स्थानिक पातळीवर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठीच अशाप्रकारे वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडवल्या जात आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ स्थानिक गुंडाच्या टोळक्यांकडून दहशत निर्माण व्हावी हा या तोडफोडीच्या घटनांमागे हेतू

पिंपरी : शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच धर्तीवर थेरगाव परिसरात ७ वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार बुधवारी(दि.२३मे) रात्री अकराच्या सुमारास नखातेनगरमध्ये घडला. महेश मुरलीधर तारू (वय ४३, रा. नम्रता हाऊसिंग सोसायटी, नखाते नगर, थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी करण शिंदे, चिक्या सूर्यवंशी,नवनाथ भातकुटे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीवरून (एम एच १४, ए एफ ४६०१) आले. आरडाओरडा करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली. तिघे नम्रता हाऊसिंग सोसायटीत आले असता महेश यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनी मिळून महेश यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातून एक हजार रुपये हिसकावून नेले. तिघांनी सोसायटी आणि शिक्षक कॉलनीमधील ७ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. स्थानिक गुंडाच्या टोळक्यांकडून दहशत निर्माण व्हावी हा हेतू या तोडफोडीच्या घटनांमागे असतो. पोलिसांकडून सातत्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जातात. मात्र, तरीही या घटनांवर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. 

टॅग्स :Thergaonथेरगावtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरCrimeगुन्हाPoliceपोलिस