पिंपरी : निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महागड्या वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर काही व्यावसायिकांच्या महागड्या गाड्या उभ्या होत्या. दरम्यान, दुचाकीवरून दहा ते पंधरा तरुण तोंडाला बांधून याठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयते, चॉपर, दांडके होते. त्यांनी वाहनांच्या काचा फोडून मोठे आर्थिक नुकसान केले . येथील नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निगडीपोलिसांत तक्रार नोंदविण्याचे कामकाज सुरू आहे.
निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:52 IST
निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महागड्या वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
ठळक मुद्देनिगडी पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे कामकाज सुरू