शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 18:28 IST

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली.

ठळक मुद्देमुलाने समयसुचकता दाखवल्याने वाईट प्रसंग टळला

पिंपरी : पिंपरीच्या साईनगर सोसायटीत लिफ्टमध्ये अडकलेल्या वर्तमानपत्र वितरक मुलाची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुमित आळसे (वय १७ वर्षे) असे या मुलाचे नाव आहे. 

साई नगरी मध्ये शुक्रवारी सकाळी सुमित वर्तमानपत्र वितरण करत होता. दोन बिल्डिंगमध्ये वर्तमानपत्र वितरण केल्यानंतर तिसऱ्या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये प्रवेश करून सातव्या मजल्यापर्यंत पोहचला. मात्र, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. अचानक आलेल्या संकटाने तो थोडासा गोंधळला. परंतु, प्रसंगाधान राखत त्याने लिफ्टमधील अलार्म बटन दाबले व वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांना काॅल केला. तांबे यांनी तातडीने सोसायटीचे चेअरमन निलेश गिते यांना फोन केला. गिते यांनी  सुरक्षारक्षक व लिफ्टच्या देखभाल करणा-या कंपनीला फोन करून अभियंत्याला बोलवले. अडकलेल्या सुमितला बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करून झाले. मात्र, ते असफल ठरू लागले. शेवटी ब्रेकरने भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि सुमितला सुखरूप बाहेर काढले. 

मला पुनर्जन्मचं मिळाला 

मी वर्तमानपत्र टाकण्यासाठी त्या लिफ्टमधे शिरलो. लिफ्ट वर जात असतांना थोडासा धक्का बसला आणि लिफ्ट एकदम वर जाऊन थांबली. लिफ्टची बटणं दाबून पाहिली. मात्र, लिफ्ट जागची हलत नव्हती. धोक्याचा इशारा असणारे बटण दाबले व तांबे सरांनाही फोन करून कळवले. सगळे आले. थोडा धीर आला. लिफ्टच्या बाहेरून सगळ्यांचे प्रयत्न चालू होते. सग‌ळे प्रयत्न निष्कामी ठरत होते. त्यामुळे माझा धीर खचत चालला होता. एका रहिवाश्याने चहा आणि पाणी एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून एका फटीतून आत टाकले. बाहेर पडण्याच्या आशा संपत चालल्या होत्या. भिंत फोडून मला बाहेर काढण्यात आले. या सर्वांनी मला पुनर्जन्मचं दिल्याच्या भावना सुमित आळसे यांने लोकमतकडे व्यक्त केल्या. 

दररोजच्या प्रमाणे सुमित वर्तमानपत्र टाकण्यासाठी साईनगरी सोसायटीत गेला होता. त्याचा फोन आल्यानंतर मी तिथे तातडीने पोहचलो. सोसायटीच्या व्यवस्थापनाला कळविले. सर्व मुलांना संकटाच्या काळात प्रसंगावधनाचे प्रशिक्षण दिले असल्याने सुमित घाबरला नाही. त्याने समयसुचकता दाखवल्याने वाईट प्रसंग टळला. असे वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे यांनी सांगितले. 

सोसायटीचे सुरक्षारक्षक तसेच विजय सोनवणे, निलेश पऱ्हाड, पंकज खटावकर हे पदाधिकारी आम्ही सर्वजण जसे जमेल तसे प्रयत्न करत होते. सोसायटीच्या पदाधिका-यांनी लिफ्टच्या मेंटन्सन करणाऱ्या अधिका-यांनाही बोलवले. आम्ही सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत होते. मात्र, असफल ठरत होतो. शेवटी सर्वमताने भिंत फोडण्याच्या निर्णय घेतला. यानंतर असे प्रसंग घडू नयेत. म्हणून आम्ही टेरेसवर सुखरूप बाहेर पडता येईल अशी छोटीशी खिडकी बसवणार आहोत.                                                                               -निलेश गिते, चेअरमन, साईनगरी सोसायटी

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीLiftmanलिफ्टमनSocialसामाजिकelectricityवीज