शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये बोगस रेशनिंगकार्ड बनवणाऱ्या दलालांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 19:39 IST

रेशनिंग ऑफिसमध्ये ओळख आहे, तुमचे काम लगेच करून देतो...

ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : बोगस रेशनिंगकार्ड बनवून देण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी येथील एका महिलेवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच प्रकार पुन्हा उघडकीस आला असून, याप्रकरणी देहूगाव येथील एका दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बोगस रेशनिंगकार्ड बनवून देणा-या दलालांचे रॅकेट शहरात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.नितीन महादेव पडाळघरे (वय 40, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनंजय ऊर्फ धनराज चव्हाण (रा. देहूगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशनिंग ऑफिसमध्ये ओळख आहे, तुमचे काम लगेच करून देतो, असे आरोपी याने फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी एक हजार दोनशे रुपये रोख, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड झेरॉक्स, पत्नीचे पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, लग्नपत्रिका, जुन्या शिधापत्रिकेची झेरॉक्स अशी कागदपत्रे आरोपी याने  फिर्यादी यांच्याकडून घेतली. त्यानंतर सुमारे 10 दिवसांनी फिर्यादी यांना नवीन केशरी रंगाची शिधापत्रिका दिली. त्या शिधापत्रिकेवर धान्य मिळावे म्हणून चौकशी करण्यासाठी ते निगडी येथील धान्य पुरवठा खात्याचे परिमंडळ कार्यालय, ह्यअह्ण विभाग येथे गेले. आरोपी याने दिलेली शिधापत्रिका बोगस असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. आरोपी चव्हाण याने विश्वास संपादन करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस