शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

Blood Report साठी 6 दिवस थांबा; नागरिकांचे आटतंय रक्त; पिंपरी महापालिका दवाखान्यातील स्थिती

By प्रकाश गायकर | Updated: October 12, 2023 16:04 IST

रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आढळत असल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते

पिंपरी : शहरामध्ये व्हायरल आजारांची साथ आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्याठिकाणी रक्ताची चाचणी करून रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यासाठी तब्बल सहा दिवस लागत असल्याचे समोर आले आहे.  शहरामध्ये महापालिकेचे आठ मोठे रुग्णालय आहेत. तर उपनगरांमध्ये दवाखाने उभारण्यात आले आहे. या दवाखान्यामध्ये स्थानिकांची मोठी गर्दी असते. त्यातच सद्यस्थितीत शहरामध्ये साथीचे आजार वाढले आहेत. रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आढळत असल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जात आहे. मात्र, पिंपळे गुरव येथील मनपा दवाखान्यामध्ये रुग्णाला तब्बल सहा दिवसानंतर रक्ताचा अहवाल घेण्यासाठी येण्यास सांगितले. मंगळवारी (दि. १०) सकाळी एक रुग्ण मनपा दवाखान्यामध्ये तपासणी करण्यासाठी पोहचला. ताप, अंगदुखी तसेच सर्दी व खोकला अशी लक्षणे होती. दवाखान्यात पोहचल्यानंतर संबंधित रुग्णाला रक्ताची चाचणी करण्यासाठी सांगितले. त्यासाठी दवाखान्यात रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णाला ‘सहा दिवसांनी अहवाल येईल, सहा दिवसांनी अहवाल घ्यायला या’ असे सांगितले.

एवढ्या दिवसांनी अहवाल येत असल्याने तोपर्यंत रुग्णांची तब्येत आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तसेच आजाराचे निदान लवकर होत नसल्याने त्यावर उपचार काय करायचे याबाबत डॉक्टरही अनभिज्ञ असतात. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालय गाठावे लागत असल्याचे समोर आले आहे. तर ज्या रुग्णांची खासगी रुग्णालयात जाण्याची परिस्थिती नसते अशा रुग्णांची तब्येत आणखी खालावत असल्याचे समोर आले आहे.

राज्य शासनाची कंत्राटी लॅब 

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये राज्य शासनाने रक्ततपासणीचे कामे ठेकेदार संस्थेला दिले आहे. हिंदलॅब्सच्या वतीने रक्ताचे नमुने घेऊन त्यांची चाचणी केली जाते. मात्र त्याचा अहवाल देण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा वेळ लागत आहे. त्यामुळे या कंत्राटी लॅबवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

दवाखान्यांमध्ये शासनाने लॅब नेमली

शहरातील काही दवाखान्यांमध्ये वेळ लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णावर काय उपचार करायचे याबाबत अडचणी निर्माण होतात. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने चाचण्या केल्या जातात. मात्र दवाखान्यांमध्ये शासनाने लॅब नेमली आहे. अहवालासाठी उशिर होत असल्याचे राज्य शासनाला कळवले आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टरdengueडेंग्यू