बौर खिंड बनली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:07 IST2017-08-02T03:07:32+5:302017-08-02T03:07:32+5:30

शहराच्या जवळील पवनानगर रस्त्यावरील चिखलसे गाव हद्दीतील बौर खिंड प्रवासासाठी धोकादायक झाली आहे. येथे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

A blast hole becomes dangerous | बौर खिंड बनली धोकादायक

बौर खिंड बनली धोकादायक

कामशेत : शहराच्या जवळील पवनानगर रस्त्यावरील चिखलसे गाव हद्दीतील बौर खिंड प्रवासासाठी धोकादायक झाली आहे. येथे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कामशेत शहरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणाºया बौर खिंडीच्या वरच्या बाजूला असणारी अनेक मोठ्या झाडांची मुळे उघडी पडली असून सोमवारी रात्रीच्या सुमारास यातील एक झाड उन्मळून वरतीच लटकले. तसेच इतर झाडांची अशीच अवस्था असून, ती झाडे कोणत्याही क्षणी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या झाडांमुळे दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
पवनानगरकडे जाणाºया रस्त्यावर बौर खिंड असून, त्या खिंडीच्या काही अंतरावर श्री केदारनाथ महादेवाचे मंदिर आहे. या रस्त्याने पवनानगर भागात अनेक गावे असून या गावांमधील दुग्ध व्यावसायिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व इतर नागरिक नेहमीच प्रवास करीत असतात. शिवाय श्रावण महिना असल्याने महादेव मंदिरातही दर्शनासाठी अनेक भाविक या रस्त्याने ये-जा करीत असतात. तसेच पवन मावळात वर्षाविहारासाठी जाणाºया पर्यटकांना कामशेतमधून हाच मार्ग आहे.
बौर खिंड ही दोन वाहने जाण्या इतपत मोठी असून या पोखरलेल्या खिंडीत वरच्या भागात अनेक झाडे आहेत. पावसामुळे या खिंडीत दरडीवरील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने या झाडांची मुळे सताड उघडी पडली असून झाडांना आधार राहिला नसल्याने अनेक झाडे रस्त्याच्या दिशेला वाकली आहेत. त्यामुळे सोसाट्याच्या वाºयात झाडे पडून झाडांबरोबर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरून जाणाºया वाहनांवर ही झाडे व दरड कोसळली तर मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्या कडून वर्तवली जात आहे.

Web Title: A blast hole becomes dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.