शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : रेमडेसिव्हिर लसीचा काळाबाजार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 19:04 IST

आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पिंपरी : कोरोना (कोविड १९) बधितांवरील उपचारासाठी जीवनदायी ठरत असलेले  रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एक महिलेसह तिघांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 शाहिद जब्बार शेख (वय ३४), विजय बबन रांजणे ( वय ३५), वैष्णवी राजेंद्र टकोरकर (वय ३०, सर्व रा.ओटा स्किम निगडी) यांना जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार केल्या प्रकरणी अटक केली आहे. मुस्तफा अब्दुल गफार तंबोळी (रा. पाटील नगर, भागरे कॉलनी चिखली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी शेख यांच्या आईवर २३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान आकुर्डी येईल खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन आवश्यक होते. बाजारामध्ये हे औषध उपलब्ध होत नव्हते. रुग्णालयात काम करणाऱ्या शेख याने फिर्यादीला १५ हजार पाचशे रुपयात दोन इंजेक्शन उपलब्ध करून दिली. बाजारात या इंजेक्शन ची मूळ किंमत ५,४०० रुपये आहे. तसेच रांजणे आणि टकोरकर यांनी फिर्यादीच्या मित्राच्या वडिलांना औषध विक्रीचा परवाना नसताना एक इंजेक्शन सहा हजार रुपयांना विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस