शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव आणि उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:56 IST

महापौरपदाच्या अर्जांची छाननी झाल्यावर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाच्या जाधव यांचा विजय झाला.

ठळक मुद्देमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ अपक्ष आणि मनसेचे भाजपला मतदानपिंपरीचे महापौर महात्मा फुले यांच्या वेशात..! महापौरपदासाठी डावलल्यामुळे भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित .

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदीभाजपाचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना ८० मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना ३३ मते पडली आहेत. सत्ताधारी भाजपाचे ३ नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक अनुपस्थित राहिले. उपमहापौरपदी भाजपाचे सचिन चिंचवडे निवड होताना ७९ मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांना ३२ मते पडली. या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांनी तटस्थाची भूमिका स्वीकारली. महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यासाठी शनिवारी विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहिले. सभेचे कामकाज सुरू होताच निवडणुक अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत निवडणुक अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामध्ये भाजपाचे राहुल जाधव यांचा विजय झाला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. अपक्ष आणि मनसेनी भाजपाला मतदान केले. 

.............................. 

पिंपरीचे महापौर महात्मा फुले यांच्या वेशात..!  पिंपरी-चिंचवडचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन सर्वसाधारण सभेत आले आहेत. तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला आहे. वेगळा वेश परिधान करुन नियोजित महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  महापौर व उपमहापौरांची आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे. महासभेला येताना जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आला आहेत.

................... 

महापौरपदासाठी डावलल्यामुळे भाजपाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित 

शत्रुघ्न काटे महापौरपदासाठी इच्छुक होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु, त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याएवजी जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे राहुल जाधव यांना महापौर देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले शत्रुघ्न काटे यांनी महासभेला अनुपस्थितीत राहत आपली नाराजी दाखवून दिली. तसेच पक्षादेश देखील झुगारला आहे.सभागृह नेत्याने पक्षादेश (व्हीप) देऊनही त्यांनी दांडी मारली. तसेच भोसरीचे रवी लांडगे देखील अनुपस्थित राहिले. नाराज असल्यानेच त्यांनीही दांडी मारल्याची जोरदार चर्चा पालिका वतुर्ळात सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस