शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

पिंपरीत क्वारंटाईन सेंटरवरुन राष्ट्रवादी, भाजपात चिखलफेक ; नगरसेवकांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 16:58 IST

भाजपा विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुडीर्तील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र नगरसेवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुडीर्तील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र उभारले आहे. यावरून भाजपा विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. नागरी भागात केंद्र उभारताना सुरक्षा चोख असावी, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतली आहे. ज्या भागातील रूग्ण असतील त्याच भागात क्वारंटाईन केंद्र उभारावे,  क्वारंटाईन केंद्र हे भाजपाने सुरू केले आहे, असा आरोप केला जात आहे, अशी भूमिका भाजपाने मांडली आहे. क्वारंटाईन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सजग नागरिक पहारा देत असताना माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शिवसेना नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. त्यावेळी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस देऊन सोडून दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुडीर्तील एका महाविद्यालयात क्वारंटाईन केंद्र उभारले आहे. या केंद्रावरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. भाजपाच्या वतीने  माजी उपमहापौर शैैलजा मोरे, शिक्षण समितीच्या माजी उपसभापती शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, अनुम मोरे, राष्टÑवादीच्या वतीने माजी उपमहापौर राजू मिसाळ, शिवसेनेच्या वतीने अमित गावडे यांनी नागरी सुरक्षेसाठी नाका सुरू केला होता. या नाक्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे.सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, प्राधिकरणातील क्वारंटाईन केंद्र भाजपामुळे सुरू झाले आहे. असा आरोप विरोधक करीत आहेत. वास्तविक उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने केंद्र उभारली आहेत. त्यात पक्षाचा संबंध नाही. क्वारंटाईन केंद्र उभारताना ज्या भागातील रूग्ण असतील तेथील जवळच्या भागातच उभारण्याची गरज आहे.माजी महापौर राजू मिसाळ म्हणाले,क्वारंटाईन केंद्र भाजपाने सुरू केले असे आमचे मत नाही. महापालिकेत सत्ता भाजपाची आहे. क्वारंटाईन केंद्र कोठे असावे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनास सांगायला हवे होते. प्रभाग अध्यक्षांनाही न विचारता प्रशासनाने केंद्र सुरू केले हा त्यांचा विषय आहे. ही प्रशासनाचीही चूक आहे. शिवसेनेचे नगरसेवक अमीत गावडे म्हणाले, प्राधिकरण ग्रीन झोन आहे.  केंद्रावर सध्या अनेक रूग्णांचे नातेवाईक येत आहेत. येथील सुरक्षेचा विचार करावा. केंद्राला विरोध नाही. परंतु प्राधिकरणात रूग्ण वाढणार नाही, याबाबत दक्षता प्रशासनाने घ्यावी.....................नगरसेवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीसक्वारंटाईन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सजग नागरिक पहारा देत असताना माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि शिवसेना नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. त्यावेळी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस देऊन सोडून दिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस