शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:22 IST

दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले.

लोणावळा : सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर आज सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण आज सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते. मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले. तसेच धरणावर लोणावळा शहर पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.

शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शहरातील विविध भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला. लोणावळा व मावळ तालुक्यासह सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने आज लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या घटली होती. भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना सकाळी मुभा देण्यात आली होती. परंतु दुपारनंतर पावसाचा जाेर वाढल्याने पुन्हा एकदा भुशी घरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले.  लोणावळा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पर्यटकांनी परिस्थितीचा आढावा घेत घराबाहेर पडावे तसेच लोणावळेकर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर येऊ नये अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. शहरात पुर परिस्थिती होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात असून नगरपरिषदेचे आपत्कालिन पथके शहरात गस्त घालत आहेत. कोठेही पाणी साचल्याची समस्या निर्माण झाल्यास नगरपरिषदेच्या आपत्कालिन कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

सकाळी असलेली पर्यटकांची गर्दी 

टॅग्स :lonavalaलोणावळाRainपाऊसDamधरणtourismपर्यटन