शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
3
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
4
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
5
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
6
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
7
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
8
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
9
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
10
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
11
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
12
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
13
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
14
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
15
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
16
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
17
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
18
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
19
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
20
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:18 IST

पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देमनुवादी दांभिक विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. भिडे गुरुजींनी वारकऱ्यांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे

पिंपरी : संभाजी भिडे यांनी धारकरी होण्यापेक्षा टाळकरी व्हावे, म्हणजे त्यांना तुकोबाराय कळतील. कोण पुढे कोण मागे असला दांभिक मनुवादी विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकेने न राहे, स्वभावाशी वरील काय, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म...भिडे यांची भीड भाड ठेवण्याएवढे आम्ही नामर्द नाही, अशी टीका देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त संभाजीमहाराज देहूकर यांनी केली आहे.पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. देहूकरमहाराज म्हणाले, तुकोबारायांचा रोखठोक भक्तीवाद देखील आम्हाला माहिती आहे. भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत. याच जाणिवेतून अशा लोकांचे खंडण आणि मंडण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंग लिहून ठेवला आहे. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, तीक्ष्ण़ उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे  असे तुकोबारांयाचे शुद्ध विचार जगणारे आणि जागविणारे आम्ही वारकरी आहोत. भिडे गुरुंजीसारखा सांप्रत मंबाजी-दंभाजी होऊन वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा छळ करत आहे. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहे. त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगाचे दर्शन घेतले असते तर नाठाळ बुद्धी सोज्वळ झाली असती. मनुचे साक्षात्कारी वारसदार म्हणून घेणाऱ्या गुरूजींपी संतांच्या अभंगमय संतांच्या विचारांना वारकरी होऊन स्पर्श केला असता तर अशी नाठाळ आणि बुद्धीभेद करणारी असभ्य वक्तव्ये केली नसती. केवळ एका समाजाच्या भल्यासाठी मनुंनी जातीभेद वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद केला. कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवले. त्या सगळ्या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी पसायदान , ज्ञानेश्वरी लिहिली. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा आकाशाऐवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे ठेवला. गुरुजींनी वारकºयांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे. 

टॅग्स :dehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी