शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

दुचाकीस्वारांनो सावधान! उड्डाणपुलांवर नायलाॅन मांजामुळे अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:49 IST

नाशिक फाटा येथे मांजाने गळा कापून २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा ऑक्टोबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता...

नारायण बडगुजर

पिंपरी : पतंगासाठी वापरण्यात येणारा नायलाॅन मांजा उड्डाणपुलावर अडकून अपघात होत आहेत. यात काही दुचाकीस्वार जखमी होत असून काही जणांना जीव गमावाला लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या.  त्यामुळे दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलांवरून जाताना सावध राहणे आवश्यक आहे.

पंतग उडवून काही जण मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. त्यासाठी नायलाॅन मांजाचा वापर केला जातो. मात्र हा मांजा जीवघेणा ठरत आहे. मांजा तुटून झाडे, केबल, इमारती, तसेच उड्डाणपुलांवर अडकतो. त्यात अडकून काही पक्षांना दुखापत होते. तसेच काही पक्षांना जीव गमवावा लागतो. उड्डाणपुलावर अडकलेल्या मांजामुळे गळा कापून काही दुचाकीस्वारांना अपघात होतो. शहरातील बाजारपेठेत ठोक तसेच किरकोळ विक्रेते आहेत. बंदी असलेला चायनिज किंवा नायलॉन मांजा आम्ही विक्री करीत नाहीत, तसेच त्याची साठवणूक किंवा वाहतूक देखील करीत नाहीत, असे यातील काही विक्रेत्यांनी सांगितले.

डॉक्टर तरुणीला गमवावा लागला जीव

नाशिक फाटा येथे मांजाने गळा कापून २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा ऑक्टोबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दापोडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला होता. मात्र सतर्कतेमुळे दुचाकीस्वार बचावला. तसेच दरवर्षी शेकडो पक्षांना दुखापत होते व काही गतप्राण होतात.  

पोलिसांकडून दोन वर्षांत एकही कारवाई नाही

चायनिज किंवा नायलॉन मांजा शहरात येतो कुठून, असा प्रश्न पक्षीप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बंदी असलेल्या मांजाच्या विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दोन वर्षांत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांचे फावले असून, त्यांना पोलिसांकडूनच ढिल देण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील या भागातील १५ उड्डाणपुलांवर आहे धोका

- नाशिक फाटा- दापोडी (सीएमई समोर)- भोसरीगाव- भुजबळ चौक, वाकड- सांगवी फाटा- जगताप डेअरी चौक- काळेवाडी फाटा- डांगे चौक- चापेकर चौक, चिंचवडगाव- एम्पायर इस्टेट, चिंचवड- टिळक चौक, निगडी- भक्तीशक्ती चौक, निगडी- स्पाईनरोड, जाधववाडी- स्पाईनरोड, मोशी- केएसबी चौक, पिंपरी

नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होऊन दगावतात. मकरसंक्रांतीच्या काळात हे प्रकार जास्त होतात. याला आळा बसला पाहिजे. नागरिकांनी उत्सव साजरा करताना पक्षांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे.- योगेश कांजवणे, पक्षीप्रेमी, पिंपरीगाव

बंदी असलेल्या मांजाची विक्री, वाहतूक तसेच साठवणूक होत असल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा मांजाची खरेदी करू नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल.डाॅ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkiteपतंग