शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दारुसाठी पैशांची मागणी करून व्यावसायिकाला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:13 IST

रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली

पिंपरी : दारु पिण्यासाठी पैसे दे, असे म्हणून व्यावसायिक असलेल्या तरुणाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मारहाण करून तरुणाला धमकी दिली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी येथे सोमवारी (दि. २१) रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.

अनिकेत विजयकुमार रामचंदानी (वय २५, रा. विजय निवास, रवी सोसायटी फेज एक जवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सनमान घोरपडे (वय ३२), गौरव घोरपडे (वय ३५, दाघेही रा. गुरुकृपा चाळ, पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी गौरव घोरपडे याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी सनमान याने फिर्यादीला थांबवून फिर्यादीजवळ जाऊन त्यांच्या गळ्यात हात घातला. तू माझ्याबरोबर चल नाहीतर तुझ्याकडे बघून घेतो, असे म्हणून आरोपी सनमान याने फिर्यादीला धमकी दिली. मी सनमान वसंत घोरपडे, माझे नाव कोणालाही विचार, तुझ्याजवळ किती पैसे आहेत, मला दारु पिण्यासाठी पैसे दे, असे आरोपी सनमान म्हणाला. त्यानंतर फिर्यादीच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी घरी जात असताना आरोपी गौरव याने फिर्यादीला हाताने मारहाण केली. जतर तू कोणास काही एक सांगितले तर तुझयाकडे बघून घेतो, अशी धमकीही दिली

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी