पत्नीला आणायला गेलेल्या जावईबापुंना सासरच्यांकडून ‘पाहुणचार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 06:18 PM2020-08-06T18:18:43+5:302020-08-06T18:20:47+5:30

जावईबापू आणि सासरच्या मंडळींमध्ये झाले किरकोळ कारणांवरून भांडण

Beaten from father-in-law to son in law who went to return wife in home | पत्नीला आणायला गेलेल्या जावईबापुंना सासरच्यांकडून ‘पाहुणचार’

पत्नीला आणायला गेलेल्या जावईबापुंना सासरच्यांकडून ‘पाहुणचार’

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 पिंपरी : माहेरी असणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्या मंडळींकडून चांगलाच  ‘पाहूणचार’ मिळाला. सासरा आणि इतर दोघांनी जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिडलेल्या सासऱ्यांनी जावयाच्या डोक्यात मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मावळ तालुक्यातील परंदवडी याठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
विजय सुशीराज छेत्रे (वय ३०, रा. परंदवडी, ता. मावळ) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरा लक्ष्मण दांडेकर आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला माहेरहून आणण्यासाठी तुर्भे येथे गेले होते. त्यावेळी विजय यांच्या सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणांवरून त्यांच्यासोबत भांडण केले. त्यानंतर विजय आपल्या घरी आले. बुधवारी सकाळी आरोपी सासरे आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार फिर्यादींच्या घरी आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी विजय, त्यांची आई, वडील आणि भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासरे लक्ष्मण यांनी विजया यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी विजय यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Beaten from father-in-law to son in law who went to return wife in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.