महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल जिल्हाप्रमुखपदी चिंचवडे, शहराध्यक्षपदी भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 00:25 IST2021-04-02T00:25:27+5:302021-04-02T00:25:55+5:30
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल केले असून शहरप्रमुख योगश बाबर यांची गच्छंती करून शहरप्रमुखपदी अॅड. सचिन भोसले यांची निवड केली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची निवड कायम ठेवली आहे.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल जिल्हाप्रमुखपदी चिंचवडे, शहराध्यक्षपदी भोसले
पिंपरी - महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल केले असून शहरप्रमुख योगश बाबर यांची गच्छंती करून शहरप्रमुखपदी अॅड. सचिन भोसले यांची निवड केली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची निवड कायम ठेवली आहे.
शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे. तर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. बाबर यांच्याकडे तीन वर्षांपासून शहरप्रमुखपद होते. त्यांच्या जागी नगरसेवक भोसले यांची निवड केली आहे. ोसले थेरगावातून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांची पहिलीच टर्म आहे. भोसले यांना साडेचार वर्षात त्यांना महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. तसेच गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड केली आहे.
स्थायी समिती सदस्यत्वासाठी ते तीव्र इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. अखेर भोसले यांना शहरप्रमुखपद बहाल केले आहे. त्यांचाकडे पिंपरी, चिंचवड, भोसरीची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भोसले यांची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.