वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे पीपल्स बँकेचे विद्यमान संचालक बबनराव भेगडे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बबनराव भेगडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबतच असल्याचा निर्वाळा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बबनराव भेगडे आणि त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना पुण्यातील पक्ष कार्यालयात बोलावून सविस्तर चर्चा केली. मागे झालेले मतभेद, समज गैरसमज दूर केले. पक्षासाठी भेगडे यांनी योगदान द्यावे, असे आवाहनही पवार यांनी त्यावेळी केले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही गैरसमज पसरल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे आपण पक्षाच्या कामापासून दूर होतो. मात्र पक्ष सोडला नव्हता. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून, त्याच पक्षात काम करणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, बबनराव भोंगाडे, उपसभापती नामदेव शेलार, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, चंद्रकांत दहिभाते, बाळासाहेब भदे, लहू सावळे, रवींद्र घारे, आयुब सिकिलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. साहेबराव टकले, शंकर वाजे,ॲड. ज्ञानेश्वर दाभोळे, रघुनाथ मालपोटे, नगरसेवक अभिजीत काळोखे, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, नवनाथ मालपोटे, विशाल मराठे, तानाजी दाभाडे, विठ्ठल जाधव, शरद भोंगाडे,राहुल पारगे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपाली दाभाडे उपस्थित होते.