कार्तिकी यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:29 AM2018-11-17T01:29:36+5:302018-11-17T01:30:27+5:30

अधिकाऱ्यांच्या सूचना : माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आढावा बैठक

Avoid the inconvenience of the devotees during Kartika Yatra | कार्तिकी यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळा

कार्तिकी यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळा

Next

आळंदी : येथील आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यास सुचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध शासकीय खात्यातील विभाग प्रमुख, अधिका-यांनी सुरक्षित, आरोग्यदायी सोहळा होण्यास केलेले यात्रा नियोजन जाहीर केले. तसेच या वेळी सूचना या बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या पीठासीन अधिकारी म्हणून खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले होत्या.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत होत आहे. या यात्रेस राज्य परिसरातून लाखो भाविक देवदर्शनास येत असतात. तीर्थक्षेत्र आळंदीत आलेल्या भाविकांसह नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी तसेच यात्रा काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आळंदी नगरपरिषद सभागृहात सोहळ्याच्या तयारी साठी नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी-पदाधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधून आढावा घेत प्रशासनाला विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सरपंच अश्विनी सस्ते, मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, आळंदी देवस्थानचे विश्वस्त अजित कुलकर्णी, नगरसेविका सुनीता रंधवे, प्रकाश कुºहाडे, सागर भोसले, संतोष गावडे, पुषा कुºहाडे, मालक उपस्थित होते. आळंदीत यात्रेच्या काळात भाविक, नागरिक यांना सेवा सुविधा देताना आरोग्य व सुरक्षितता कायम राहील याची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ३० नोव्हेंबर पासून आळंदी कार्तिकी यात्रा सुरु होत आहे.त्यापूर्वी भाविक नागरिक यांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. यावेळी शासकीय अधिकारी, विभाग प्रमुख यांनी बैठकीत सादर केलेल्या नियोजन प्रमाणे कामकाज करण्याचे सूचना देत नियोजना प्रमाणे कामकाज करण्यास दक्षता घेण्याचे आवाहन केले, भाविकांची दर्शनबारीची व्यवस्था आळंदी देवस्थान, नगरपरिषद व जागा मालक यांच्यात संवाद साधून पर्यायी व्यवस्था करण्यास मार्ग काढला जाईल. पुढील वर्षी दर्शनबारीचा विषय रहाणार नाही. भाविकांसाठी दर्शनबारीचा प्रश्न मार्गी लावू. यात्रा काळातगैरसोय होऊ देणार नाही अशी ग्वाही वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

आळंदीतील यात्रा नियोजनात सुसंवाद वाढविणार : भूमकर
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने भाविकांसाठी यात्रा काळात विविध विभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे. कामगार, पदाधिकारी, अधिकारी सर्व शासकीय खात्यांचे प्रमुख यांचे मधील सुसंवादातून भाविकांना प्रभावी सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.

यात्रा काळात तात्पूत्या स्वरूपात नगरपरिषदेच्या वतीने सारा प्लास्टचे तसेच आळंदी देवस्थानचे वतीने १०० स्वच्छता गृहांची सोय करण्यात येत आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३८२ स्वच्छता गृहे वापरण्यास उपलब्ध करण्यात आली आहे.परिषदेसह अतिरिक्त जादा कामगार ३ सत्रात यात्रा काळात कार्यरत राहणार आहेत. स्वच्छतेचे कामकाज दिवस रात्र करण्यात येणार असल्याने शहरात यात्रा काळात कचरा साठून राहणार नाही.१० धुरळणी यंत्रांचे माध्यमातून धुरीकरण करण्यात येणार आहे.
 

Web Title: Avoid the inconvenience of the devotees during Kartika Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.