शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

देह विक्रीसाठी नकार दिल्याने सोळा वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रयत्न; मावळातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:25 IST

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

पिंपरी : देह विक्रीसाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला गळा दाबून व चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. २६) व सोमवारी (दि. २७) या दोन दिवसांच्या कालावधीत मावळातील सोमाटणे व गाडुंबरे गावाजवळ घडली.

याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी पवन कुमार अयोध्या प्रसाद (वय २३ रा. उत्तर प्रदेश ) महिला आरोपी व दीपक गोवारी यादव (२१, रा. उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी पीडितेशी प्रेम संबंध तयार केले. त्यानंतर पवन कुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देह विक्रीची मागणी केली. यावेळी पीडितेने त्यांना नकार दिला. तिला मूळगावी सोडण्याचा बहाणा करून तिला दुचाकीवर घेऊन जाऊन संशयित महिला आरोपीच्या भाड्याच्या खोलीत तिला ठेवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी तिला अंधारात घेऊन जाऊन तिच्या मानेच्या पाठीमागील बाजूला चाकूने वार केला, तसेच गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळ