मेहुण्याच्या भांडणाच्या रागातून जावई-सासर्याचा खूनाचा प्रयत्न
By Admin | Updated: May 7, 2014 04:22 IST2014-05-06T19:02:34+5:302014-05-07T04:22:49+5:30
मेहुण्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून सासूरवाडीला भेटीसाठी गेलेल्या जावई- सासर्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.

मेहुण्याच्या भांडणाच्या रागातून जावई-सासर्याचा खूनाचा प्रयत्न
पुणे : मेहुण्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून सासूरवाडीला भेटीसाठी गेलेल्या जावई- सासर्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.
अमित दिपक आरडे (वय २१), सचिन विष्णु रासगे (वय २२, दोघे रा. मल्हार मार्तंड सोसायटी, पद्मावती), गौरव यशवंत सोनवणे (वय २१, रा. नवजीवन सोसायटी, पद्मावती) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश पितांबर ढावरे (वय ३४, रा. टांगेवाला कॉलनीमागे, पद्मावती) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींचा पद्मावती देवीच्या ऊरूसाच्या दिवशी ढावरे यांचे मेहुणे दिपक कश्यपशी भांडणे झाली होती. दरम्यान ढावरे हे त्यांचे सासरे दिनेश प्रभू कश्यप यांच्याघरी पत्नी मुलांसह गेले होते. यावेळी आरोपींनी दिपक कुठे आहे अशी विचारणा करत ढावरे, त्यांचे सासू, सासरे व पत्नी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी आरडे याने ढावरे व त्यंाचे सासरे क श्यप यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. अमित आरडे हा सराईत गुन्हेगार असून हा जीवघेणा हल्ला त्याने कोणत्या कारणासाठी केला याबाबत तपास करायचा आहे. गुन्ात वापरलेले हत्यार हस्तगत करायचे आहे. क श्यप हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ससून येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यामुळे तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची सरकारी वकिल सुप्रिया मोरे देसाई यांनी मागणी केली. न्यायालयाने ती ग्रा धरली.