अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शिलवंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:39 PM2020-10-09T17:39:34+5:302020-10-09T17:42:53+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सम्राट अशोकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले होते.

Ashok Shilwant passes away due to heart attack | अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शिलवंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शिलवंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

googlenewsNext

पिंपरी : सम्राट अशोकांचे विचार जणसामान्यात पोहोचविण्याचे काम करणारे, अशोक सर्वांगिण सोसायटीचे संस्थापक अशोक शिलवंत (58) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सम्राट अशोकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले होते. शिलवंत यांनी गेल्या काही वर्षांपासून अशोक सर्वांगिण सोसायटीच्या माध्यमातून देशातील विविध भागात अशोक स्तंभ उभारण्याची मोहीम सुरू केली होती. तसेच अशोक सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम केले. ते संततुकारामनगर परिसरात वास्तव्यास होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर  यांचे ते वडील होत.
संत तुकारामनगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिलवंत यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले आहे.

Web Title: Ashok Shilwant passes away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.