शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: June 18, 2025 16:20 IST

Warkari Accident: देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.

चिखली : देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथील शेलारवस्ती परिसरात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास क्रेनखाली येऊन जखमी झालेल्या वारकऱ्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. नारायण राणबा गोरवे (वय ६२, रा. आहेरगाव, ता. माढा, जिल्हा सोलापूर) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी क्रेनचालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर वारकरी नारायण गोरवे देहूहून आळंदीला पायी निघाले होते. चालत असताना चिखली येथे अचानक क्रेनचा धक्का बसून चाकाखाली पडले. त्यांचे दोन्ही हात, पाय निकामी झाले. अपघातस्थळी रुग्णवाहिकेची तत्काळ मदत न मिळाल्याने गोरवे यांना खासगी रिक्षाने रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. रस्त्यात मध्ये रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांना तिच्यातून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.नारायण गोरवे पंधरा वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत होते. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानासाठी ते देहूला गेले होते. त्यानंतर देहूकडून आळंदीकडे पायी जाताना चिखली येथे हा अपघात झाला.देहू-आळंदी रस्त्यावर एकेरी वाहतूकचिखली येथे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दौरा होता. दौऱ्यादरम्यान चिखली परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दौऱ्यासाठी शेलारवस्ती परिसरातील देहू-आळंदी रस्त्यावर एकेरी वाहतूक केली होती. यादरम्यान क्रेनच्या अपघातात वारकरी नारायण गोरवे जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025AccidentअपघातAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीtalawadeतळवडे