शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:30 IST

तुकोबांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी : दिंड्यांना फराळाचे वाटप; पावसामुळे पाणी साचले, वारकऱ्यांसह भाविकांचे हाल, वीरस्थळ चौकात देहूरोड कॅन्टोन्मेंट, झेंडेमळा येथे ग्रामस्थ, सीओडी डेपोकडून वारकऱ्यांचे स्वागत, चिखल तुडवत प्रवास सुरू

- देवराम भेगडे पुणेकिवळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी पावणेदोनला विश्रांतीला चिंचोलीत विसावला. शनिमंदिरासमोर पालखी रथावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. लाखो वारकरी चिंचोलीत थांबले असताना भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.

पाणी साचल्याने वारकऱ्यांचे दुपारच्या भोजनाचे हाल झाले.देहूरोडला महामार्गावरील वीरस्थळ चौकात कॅन्टोन्मेंटकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दिंड्यांना फराळाचे वाटप  करण्यात आले. मुसळधार पाऊस अंगावर झेलत वारकरी मोठ्या आनंदात संतांचे अभंग गात चालले होते.

कॅन्टोन्मेंट हद्दीत झेंडेमळा येथे ग्रामस्थांनी, सीओडी डेपोच्या वतीने अधिकारी तसेच कर्मचारी संघटनांनी स्वागत केले. पालखी येण्यापूर्वी पादुका मंदिर परिसरात चिंचोली, किन्हई, कान्हेवाडी, किवळे, विकासनगर, रावेत, गहुंजे आदी गावांतील भाविक भरपावसात दर्शनासाठी थांबलेले होते.

मुख्य मंदिरासमोर पालखीरथ आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्याहस्ते अभंग व आरती झाली. यावेळी नंदकुमार काळोखे, बाळासाहेब जाधव, शीतल हगवणे उपस्थित होते. देवस्थान समितीच्या वतीने रमेश जाधव, दत्तात्रय लांडगे, गोविंद भेगडे यांच्याहस्ते दिंडी चालकांचा व विणेकऱ्यांचा उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार केला.

कॅन्टोन्मेंटच्या वतीने फराळ वाटप, आरोग्य सुविधा

देहूरोड येथील संत तुकाराम महाराज स्वागत प्रवेशद्वार येथे पालखी रथावर तुषार तरस, तरस परिवार व राजा शिवछत्रपती मराठा सोसायटीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. कॅन्टोनमेंट बोर्डाचे सदस्य अॅड. कैलास पानसरे, माजी उपाध्यक्ष मदन सोनीगरा, रघुवीर शेलार यांनी स्वागत केले.२ बोर्डाच्या वतीने दिंड्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या वतीने दिवसभर सुमारे दोन हजार वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तपासणी करून व औषधे देण्यात आली. काहींच्या पायांची मालिश करण्यात आली.

वीजपुरवठा युद्धपातळीवर करण्यात आला सुरळीतचिंचोली परिसरात बुधवारी सायंकाळनंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. वरिष्ठ अभियंता संतोष झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या अर्ध्या तासात युद्धपातळीवर दुरुस्ती करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली.

हातावर पत्रावळी घेऊन वारकऱ्यांचे भोजनपालखी विसावा ठिकाण चिखलमय झाले असतानाही वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. पावसामुळे ते हातावर पत्रावळी घेऊन भोजन करीत होते. देहूरोडकडे जाणारा रस्ता वारकऱ्यांनी व्यापला होता. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूर