शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 

By नारायण बडगुजर | Updated: June 20, 2025 16:46 IST

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने यांच्यासह आठ तृतीयपंथींची पायी वारी

पिंपरी : संतांनी दिलेला समतेचा विचार पायी वारी सोहळ्यातून पुढे नेला जात आहे. वारीत महिला आणि पुरुषांना जसा सन्मान मिळतो तोच सन्मान आम्हाला मिळाला पाहिजे कारण ही समतेची वारी आहे, यात कोणताही भेदाभेद नाही, ही संतांची शिकवण आम्ही अनुभवत आहोत, असे किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डाॅ. दीपा राजमाने यांनी सांगितले.

पुणे येथील मंगलमुखी केंद्र किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुढाकार घेण्यात आला असून त्यानुसार डाॅ. दीपा यांच्यासह आठ तृतीयपंथी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पायी वारीचे त्यांचे हे तिसरे वर्ष आहे. डाॅ. दीपा आणि त्यांचे सहकारी रामकृष्ण हरी आणि जयहरी म्हणत अभंगांमध्ये दंग होत आहेत. वारीत ते लक्ष वेधून घेत असून अनेक जण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करतात. तसेच अनेक जण त्यांचे आशीर्वाद देखील घेत आहेत.

डाॅ. दीपा म्हणाल्या, संतांनी भेदभाव केला नाही. तसेच वारीत सहभागी होण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिले जात नाही. वारकरी आणि भाविक स्वत: उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यामुळे आम्ही देखील संतांची शिकवण घेण्यासाठी वारीत सहभागी झालो. इतर वारकऱ्यांप्रमाणेच आम्हाला जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे या भक्तीमय वातावरणाचा आनंद घेता येत आहे. आम्हालाही संतांची भक्ती करण्याचा आणि मानव धर्माची पताका खांद्यावर घेता येत आहे.

संत परंपरेत भेदभाव नाही

‘सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे’, असे संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगातून सांगितले आहे. त्याचप्रमाणे धर्म, जात, वर्ण असा भेदभाव संत परंपरेत केला जात नाही. त्यामुळे वारीत गरीब, श्रीमंत, महिला, पुरुष सहभागी होतात. त्याचप्रमाणे आम्ही देखील सहभागी झालो आाहेत, देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहोत, असे डाॅ. दीपा यांनी सांगितले.  

पहिला मान आम्हालाच...

पहिल्यांदा आम्हाला वारीत सहभागी होण्यासाठी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिंडी क्रमांक १३ मध्ये हभप गवळी महाराजांनी आम्हाला त्यांच्या दिंडीत सहभागी केले. त्यामुळे आमच्याशी बोलताना आता ‘माउली’ असे म्हणून इतर वारकऱ्यांसारखी वागणूक मिळत आहे. दिंडीत जेवणाचा, आरती, पूजा तसेच इतर सर्व कामांसाठी पहिला मान आम्हाला दिला जातो, ही आमच्यासाठी विशेष बाब आहे, असे डाॅ. दीपा यांनी सांगितले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५