शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वाघजरीच्या घनदाट जंगलात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला अटक; लोणावळा पोलिसांची चित्तथरारक कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 20:45 IST

पुणे शहर परिसरात त्याच्यावर विविध प्रकारचे सुमारे 60 ते 70 गुन्हे दाखल

ठळक मुद्देसशस्त्र व सर्व बचावात्मक साहित्यांनिशी भरपावसात वाघजरीच्या डोंगरात शोध मोहिम

लोणावळा : खंडाळा येथील वाघजरीच्या डोंगरात एका कपारीत तळ ठोकून बसलेल्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलिसांनी चित्तथरारक कामगिरी करत अटक केली. पुणे शहर परिसरात त्याच्यावर विविध प्रकारचे सुमारे 60 ते 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.बिभीषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय ४२, रा. २२०, मंगळवार पेठ, पुणे) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.खंडाळा येथे एका बंगल्यातील किंमती व जुन्या काळातील ऐवजांची चोरी झाली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर स्थानिक गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती समजली की एक अट्टल चोरटा नागफणी सुळक्याच्या मागील बाजुला असलेल्या वाघजरीच्या डोंगरात घनदाट जंगलात एका कपारीत तळ ठोकून बसला आहे. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काॅन्स्टेबल राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, अजीज मेस्त्री, मनोज मोरे व पोलीस मित्र यांनी सशस्त्र व सर्व बचावात्मक साहित्यांनिशी भरपावसात वाघजरीच्या डोंगरात शोध मोहिम सुरू केली. आकाशातून कोसळणारा जोरदार पाऊस, अंगाला बोचणारा वारा, जंगलात झाडा झुडपांमधून वाट काढत सलग दोन तासाची पायपिट करून बाब्या जगतापचा ठावठिकाणा शोधून काढला, मात्र त्याच्याकडे कोणते शस्त्र आहे याची कल्पना नसल्याने पथकाने सर्व खबरदारी घेत सापळा रचत बाब्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता पुणे परिसरात त्याच्यावर 60 ते 70 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

   याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक वैभव सुरवसे हे करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी