शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पगाराच्या पार्टीनंतर वाद; भांडणातून तोंडावर सिमेंटची विट मारून मजुराचा खून

By नारायण बडगुजर | Updated: September 4, 2023 19:51 IST

पगाराच्या पार्टीनंतर पुन्हा मद्यपानासाठी गेले असता दोघांमध्ये किरकोळ भांडणे झाली

पिंपरी : मद्यधुंद असलेल्या दोन मजुरांमध्ये भांडण झाले. यात एकाने दुसऱ्या मजुराच्या तोंडावर सिमेंटची विट मारून जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. खून प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किवळे येथे सोमवारी (दि. ४) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

विवेक गणेश पासवान (२४, मूळ रा. उत्तरप्रदेश), असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. शिवकुमार घनश्याम प्रजापती (१९, रा. मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनेश विलास यादव (२०, मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गालगत किवळे येथे रुणाला गेटवे सोसायटीजवळ निर्माण माईल स्टोन ही बांधकाम साईट आहे. या साईटवर विवेक पासवान, संशयित दिनेश यादव आणि फिर्यादी शिवकुमार प्रजापती यांच्यासह अन्य काही जण मजूर म्हणून फरशी बसविण्याचे काम करतात. त्यातील विवेक हा इतर पाच जणांसह साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहण्यास होता. त्याचा आणि त्याच्यासोबतच्या इतर मजुरांचा रविवारी पगार झाला. त्यामुळे विवेकने काही मजुरांसह पार्टी केली. त्यानंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले असता विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपानासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची विट मारली. यात गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश यादव हा तेथून पळून गेला.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून विवेक याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिनेश यादव पोलिसांकडून शोध सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक