मुंबई-पुणे महामार्गावर अपोलो गॅरेजला लागली आग, वर्कशाॅप जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 20:41 IST2017-11-27T20:40:50+5:302017-11-27T20:41:08+5:30

Apollo Garage fire on fire, workshap fire on Mumbai-Pune highway | मुंबई-पुणे महामार्गावर अपोलो गॅरेजला लागली आग, वर्कशाॅप जळून खाक 

मुंबई-पुणे महामार्गावर अपोलो गॅरेजला लागली आग, वर्कशाॅप जळून खाक 

लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा येथील अपोलो गॅरेजला आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने वर्कशाॅप जळून खाक झाले.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपोलो नावाचे मोठे कार गॅरेज आहे. या गॅरेजला अचानक आग लागल्याने वर्कशाॅप मधील साहित्य पुर्णतः जळून खाक झाले. लोणावळा नगरपरिषदेच्या जवळच ही घटना घडली. मात्र, फायरब्रिगेड घटनास्थळी पोहचण्यासाठी अर्धा तास लागला.

स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरुन जाणारा एक पाण्याचा टॅकर थांबवत पाण्याचा मारा केला आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. वेळेत आग आटोक्यात न आल्याने आग भडकली होती. गॅरेजच्यालगत असलेली काही दुकाने तसेच रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता असल्याने व  महामार्गावर ही आग लागल्याने घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Apollo Garage fire on fire, workshap fire on Mumbai-Pune highway