वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:32 IST2018-10-12T19:29:06+5:302018-10-12T19:32:04+5:30
शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत.वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. महापालिकेनिषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार आहे.

वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत
रावेत : विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या शहर आणि परिसरात निगडी प्राधिकारणातील सेक्टर २५ आणि २७ मध्ये वृक्ष छाटणीच्या नावाखाली अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या खात्याच्या कार्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंघोळीची गोळी संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिम्मित पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल काल शहरातल्या विविध सामाजिक संस्थांना सन्मान म्हणून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. महापालिकेला निषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार असल्याचे "अंघोळीच्या गोळीचे" पिंपरी- चिंचवड अध्यक्ष सचिन काळभोर यांनी सांगितले.शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत. अगदी तीस वर्षांपूवीर्चे जुने झाडे निर्दयीपणे तोडण्यात आले. वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. या प्रकारावर निसर्गप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. वृक्षतोडीच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी कायदेशीर पाठपुरावा सुरू केला आहे. शहरातील अन्य ज्या संस्थांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट करावी यात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
*शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे याबाबत वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठेही कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक ही गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही. जर झाडांचे रक्षणच नाही करू शकलो तर अंघोळीची गोळी ला मिळालेले प्रशस्तिपत्रक काय कामाचे.वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम्हाला दिलेला सन्मान आम्ही महापालिकेला सोमवारी परत करणार आहोत.- सचिन काळभोर,अध्यक्ष,अंघोळीची गोळी,पिंपरी चिंचवड