शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:48 IST

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे पसार झाले. त्यामुळे महाराजांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेचे परिसरात कौतुक होत आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांची पहाटे चारच्या सुमारास दोन जणांना अटक

मावळ : पुणे-मुंबई रोडवर ब्राह्मवाडी हद्दीत गुरूनानक ढाब्यावर चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २३ हजार लुटल्यानंतर चोरटे मावळ बाजारपेठेतील कन्हैयालाल बाफना या सोन्याचांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी साध्वी अनुप्रेक्षजी महाराज यांच्यामुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तसेच दोन आरोपी पोलिसांनी पकडले. अमोल भगवंत शिंदे (रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. चांदवडी फाटा राजगुरुनगर) अजय सुरकास पवार (रा. राजगुरुनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूनानक ढाब्यावर हनुमंत परमेश्वर क्षीरसागर हा चालक ट्रकमध्ये झोपला होता. त्याला चाकूचा धाक दाखून त्याच्या कडील २३ हजार ५०० रुपये व दोन मोबाइल घेतले. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास बाफना याच्या दुकानाच्या मागच्या खिडकीचे लोखंडी गज कापले. पाठीमागे बसविलेले  कॅमेरे यांचे तोंड वर फिरवले. त्या वेळी त्यांच्या पत्नीनीने चोरांना वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाहिले. घरातील सर्वजण ओरडू लागले. पण आजूबाजूचे कुणी जागे झाले नाही.  अखेर महाराजांमुळे मोठा अनर्थ टळला..बाफना याच्या घराच्या मागे महावीर भवन आहे. चातुर्मास असल्याने त्या ठिकाणी महाराज आहेत. त्याचे ध्यान, तप चालू होते. ओरडण्याचा आवाज अनुप्रेक्षजी महाराज यांना आला. त्यानी राजेश बाफना यांना फोनवरून ही माहिती दिली. राजेश यांनी पोलिसांना  पहाटे तीन वाजता माहिती कळवली पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबा शिंदे, पी. बी. टेकाळे, दिलीप सुपे, विरणक प्रवीण, शशिकांत लोंढे हे अवघ्या पाच मिनिटांत तेथे आले. दरोडेखोर पळून गेले होते. पाठलाग करून दोघांना पकडले.

टॅग्स :mavalमावळPoliceपोलिसCrimeगुन्हाGoldसोनं