‘पोलीस काकांची’ मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:58 IST2017-08-01T03:58:36+5:302017-08-01T03:58:36+5:30
शाळा, महाविद्यालयांच्या आवारातील वाढत्या हुल्लडबाजीला वेसण घालण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून ‘पोलीस काका’ यंत्रणा राबविली जाणार आहे.

‘पोलीस काकांची’ मात्रा
पिंपरी : शाळा, महाविद्यालयांच्या आवारातील वाढत्या हुल्लडबाजीला वेसण घालण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून ‘पोलीस काका’ यंत्रणा राबविली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणारा त्रास, रॅगिंगच्या प्रकारांना आळा बसेल, असा पोलिसांकडून विश्वास व्यक्त केला जात आहे.
‘आयटी’मधील तरुणींना होणारा वाढता त्रास लक्षात घेता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ‘बडी कॉप’ संकल्पना सुरू केली आहे. काही शालेय विद्यार्थ्यांनी आमच्यासाठीही अशीच यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी आयुक्त शुक्लांकडे मागणी केली होती. या मागणीचा गंभीरपणे विचार करत त्याच धर्तीवर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या मदतीसाठी ‘पोलीस काका’ यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओदेखील शुक्ला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शुक्ला यांनी सांगितले की, ‘बडी कॉप’ला आयटीयन्सकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुलीदेखील आपल्या सुरक्षेबाबत सतर्क झाल्या आहेत. आमच्यासाठीही अशीच यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत होती.